Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवड भागात गुंडाकडून दहशत पसरवण्याचा प्रयत्न, शर्ट काढून....; पोलिसांनी दिला चोप

त्याला आता पोल्सांना चांगलाच चोप दिला आहे. सध्या तो पोलिसांच्या अटकेत आहे.

Maharashtra Police | (Photo Credit - Twitter/ANI)

Chinchwad Aakurdi Crime: पुणे, पिंपरी चिंचवड भागात गाव गुंडांचा(gangster) धुमाकूळ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तिथे सुरू असलेल्या गुंडाराजवरून(terror) गुंडांमध्ये खाकीचा धाक उरला नसल्याचं चित्र वेळोवेळी समोर आलं आहे. हातात कोयता, बंदूक घेऊन, कॉलर उडवत धमकी देण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात तिथे दिवसा-ढवळ्या घडताना दिसत आहेत. अशीच एक घटना चिंचवडच्या आकुर्डी भागात घडली आहे. एक सराईत गुंड रसत्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास द्यायचा. त्यांची अडवणूक करायचा. पोलिसांमध्ये ही तक्रार दाखल होताच त्यांनी त्या सराईत गुंडाला चांगलाच चोप दिला. सध्या तो पोलिसांच्या अटकेत (custody) आहे. (हेही वाचा :Nagpur Crime News : नागपूरमध्ये बनावट लग्न लावून पैसे उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चार आरोपींना अटक )

पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात काहीजण रिल्समधून एकमेकांना आव्हान देतात. काहीजण दुकाने-सोसायटीत घुसून खंडण्या गोळा करतात. त्यामुळे आता पोलीसदेखील अलर्ट झाले असून अशा गावगुंडांचा 'जाहीर सत्कार' करुन त्यांना चांगलाच 'प्रसाद' देत आहेत.

पिंपरीच्या आकुर्डी भागात एक उर्दू शाळा आहे. येथून नागरिकांची चांगली वर्दळ सुरू असते. या भागात सराईत गुंड बेंद्याची दहशत होती. तो येथील रस्त्यावर शर्ट काढून फिरायचा. बऱ्याचवेळा तो दारुच्या नशेत असायचा. त्यामुळे आपण काय करतोय?यावर त्याचे नियंत्रण नव्हते. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. काहींना तर याने विनाकारण मारहाण केल्याच्या तक्रारी होत्या. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे इथल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. बेंद्या सोनी असे या गुंडाचे नाव असून तो रात्रीच्या वेळी नागरिकांना बराच वेळ त्रास द्यायचा.