Phone Tapping Case: आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात फोन टॅपिंग प्रकरणी गुन्हा दाखल
महाराष्ट्रभर गाजलेल्या फोन टॅपींग प्रकरणात (Phone Tapping Case) पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुणे पोलिसांनी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये (Band Garden Police Station Pune) हा गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्रभर गाजलेल्या फोन टॅपींग प्रकरणात (Phone Tapping Case) पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुणे पोलिसांनी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये (Band Garden Police Station Pune) हा गुन्हा दाखल केला आहे. बेकायदेशीरपणे विविध लोकांचे फोन टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. बेकायदेशीरपणे फोन टॅप प्रकरण न्यायालयात आहे. दरम्यान, हा गुन्हा दाखल केला गेला आहे. परिणामी या प्रकरणात मोठी हालचाल सुरु झाल्याचे बोलले जात आहे.
रश्मी शुक्ला या पुण्याच्या गुप्तवार्ता पदावर तत्कालीन आयुक्त होत्या. त्यांच्या कार्यकाळात फोन टॅपींग बेकायदेशीररित्या झाल्याचा आरोप आहे. शुक्ला या सध्या हैदराबाद येथे प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. शुक्ला यांच्यावर असलेल्या फोन टॅपींग प्रकरणात तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात आली होती. या सिमीतीने चौकशी करुन राज्य सरकारला अहवाल दिला आहे. या अहवालानुसार राज्य सरकारने रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. (हेही वाचा, Rashmi Shukla: आयपीएस रश्मी शुक्ला यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली; कारवाईपूर्वी 7 दिवस नोटीस देण्याचे निर्देश)
रश्मी शुक्ला यांना फोन टॅपींग प्रकरणात चौकशीला हजर राहण्यासाठी सायबर पोलिसांकडून दोन वेळा समन्स पाठविण्यात आले होते. मात्र, कोरोना महामारीचे कारण देत रश्मी शुक्ला यांनी दोन्ही वेळा चौकशीला सामोरे जाणे टाळले होते. इतकेच नव्ह तर ईमेलद्वारे प्रश्न पाठवल्यास त्याची उत्तरे देईन असेही रश्मी शुक्ला यांनी म्हटले होते.
(The above story first appeared on LatestLY on Feb 26, 2022 02:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

