महाराष्ट्रात लवकरच स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल; CM Eknath Shinde यांची VAT संदर्भात मोठी घोषणा

यापूर्वी महाराष्ट्र विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून आपल्या पहिल्याच भाषणात एकनाथ शिंदे म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने आज एकनाथ शिंदे यांनी शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन केले आहे.’

पेट्रोल डिझेल (Photo Credits: Getty)

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेले राजकीय नाट्य हळूहळू शांत होत आहे. नवीन सरकार स्थापन झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत. दरम्यान, आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा दुसरा दिवस होत्र. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले की, त्यांचे सरकार लवकरच इंधनावरील व्हॅट (मूल्यवर्धित कर) कमी करणार आहे. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर झालेल्या चर्चेला उत्तर देताना शिंदे यांनी इंधनावरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळात घेतला जाईल, अशी माहिती सभागृहात दिली.

एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून पहिली मोठी घोषणा केली असून, राज्यात पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याबाबत भाष्य केले. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले की, बहुतांश भाजपशासित राज्यांनी इंधनाच्या दरात कपात केली असली तरी विरोधी सरकारे तसे करण्यास तयार नाहीत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 5 आणि 10 रुपयांची कपात केली होती, त्यावेळी भाजप शासित राज्यांनीही व्हॅटमध्ये कपात केली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, एप्रिलमध्ये विरोधी पक्षशासित राज्यांनी इंधनावरील व्हॅट कमी करण्याची पंतप्रधानांची सूचना नाकारली होती. विरोधी-शासित राज्यांनीही यापूर्वी नकार दिला होता. दरम्यान, यापूर्वी महाराष्ट्र विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून आपल्या पहिल्याच भाषणात एकनाथ शिंदे म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने आज एकनाथ शिंदे यांनी शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन केले आहे.’ (हेही वाचा:  शिवसेनेला वाचवण्यासाठी मी एकटा शहीद झालो तरी चालेल, मी लढेन पण मागे हटणार नाही - एकनाथ शिंदे)

नुकत्याच झालेल्या बंडखोरीच्या दिवसांची आठवण करून देताना ते म्हणाले, ‘गेल्या 15-20 दिवसांपासून शिवसेनेचे 40 आमदार आणि 11 अपक्ष आमदार, असे एकूण 50 आमदार माझ्यासोबत आहेत... एवढा मोठा निर्णय घेण्याचे धाडस दाखवले. या सर्वांचे आभार.’



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif