Petrol Diesel Rate Today: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महागले, पाहूया मुंबई, पुणे सह महत्त्वाच्या जिल्ह्यांतील आजचे दर
मुंबईत आज पेट्रोलचे (Petrol) दर 89.78 रुपये प्रति लीटर इतके आहे तर डिझेलचा (Diesel) दर 79.93 रुपये प्रति लीटर इतके आहे.
Petrol Diesel Rate On 5th December: या वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर मध्ये सामान्य नागरिकांना अनेक सुखद धक्के मिळाले. ज्यात बँकिंग सुविधेमध्ये झालेले बदल हे नक्कीच नागरिकांच्या हिताचे होते. मात्र दुसरीकडे पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Rate) मात्र वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील जवळपास 19 जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 90 रुपयांच्या पार गेले असून डिझेल 80 च्या पार गेले आहे. यामुळे डिसेंबर महिन्यात आऊटिंग प्लॅन बनविण्यांवर देखील महागाईची कु-हाड कोसळली आहे असे म्हणायला हरकत नाही. मुंबईत आज पेट्रोलचे (Petrol) दर 89.78 रुपये प्रति लीटर इतके आहे तर डिझेलचा (Diesel) दर 79.93 रुपये प्रति लीटर इतके आहे.
दरम्यान नागपूर, परभणी, नांदेड, सोलापूर, अमरावती, औरंगाबाद आणि बुलढाणा या जिल्ह्यात डिझेलच्या किंमतीत 80 रुपयांच्या वर गेली आहे. काल सरकारी तेल कंपन्यांनी डिझेल- पेट्रोलच्या किंमती वाढवल्याचे जाहीर केले आहे. डिझेलच्या दरात 18 ते 20 पैशांची वाढ झाली तर पेट्रोलचे दर 15 ते 17 पैशांने वाढले होते. त्यात आज पुन्हा वाढ झाली आहे.हेदेखील वाचा- Gold Rate on 1st December: सोन्याच्या दरात घसरण सुरुच, जाणून घ्या मुंबई, पुणे, नवी दिल्ली, चेन्नईसह महत्त्वाच्या शहरातील आजचे भाव
पाहूया मुंबई, पुणे, नाशिकसह महत्त्वाच्या जिल्ह्यांतील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर
जिल्हा | पेट्रोल (प्रति लीटर रुपये) | डिझेल (प्रति लीटर रुपये) |
मुंबई | 89.78 | 79.93 |
पुणे | 89.84 | 78.79 |
ठाणे | 89.38 | 78.31 |
नागपूर | 90.29 | 80.48 |
नाशिक | 89.8 | 78.76 |
परभणी | 91.77 | 80.65 |
रत्नागिरी | 91.22 | 80.11 |
सिंधुदुर्ग | 91.34 | 80.26 |
ही आकडेवारी goodreturns या संकेतस्थळावरून देण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात पेट्रोल- डिझेलच्या दरात ही आतापर्यंतची विक्रमी वाढ आहे असे सांगण्यात येत आहे. या महिन्यात ख्रिसमस, थर्टी फर्स्ट निमित्त लोकांचे आउटिंग प्लान्स ठरतात. अशातच पेट्रोल-डिझेलचे वाढत जाणारे दर नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लावणारे आहेत. यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.