Petrol, Diesel Price In Maharashtra: पेट्रोल, डिझेल दर कपात? महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वस्तात टाकी फूल करण्याची संधी? घ्या जाणून
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election) पूर्वी पेट्रोल, डिझेल आणि तत्सम इंधन दरात कपात (Fuel Price Cut) होण्याची शक्यता आहे. अर्थात अधिकृत सूत्रांनी त्याबात कोणतेही भाष्य केले नाही.
पेट्रोल, डिझेल ( Petrol, Diesel Price) आणि तत्सम इंधन दर कमी (Fuel Price Cut) होण्याची शक्यता आहे. खास करुन महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) च्या पार्श्वभूमीवर ही शक्यता कैक पटींनी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय तेल बाजार नेहमीच अस्थित असतो. त्याचा जगभारातील विविध देशांमध्ये असलेली स्थानिक महागाई आणि नागरिकांच्या आयुष्यवर मोठा प्रभाव पडतो. परिणामी महसूल मिळविण्याचा महत्त्वाचा मार्ग असला तरीही, राज्य आणि केंद्र सरकार निवडणुकांच्या तोंडावर इंधन दर स्थिर किंवा कमी राहतील यावर लक्ष ठेवतात. त्यामुळे राज्यातील जनतेलाही वाहनाची टाकी पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अशाच प्रकारचा काहीसा दिलासा मिळतो का? याबाबत उत्सुकता आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी इंधन दर कपात?
पेट्रोल, डिझेल आणि तत्सम इंधन दर कमी होण्याची शक्यात वर्तवली जात असली तरी, प्रत्यक्षात मात्र तसे घडेल याचीही खात्री नाही. इकॉनॉमिक्स टाईम्सने तेल मंत्रालयातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याचा हवाला देत म्हटले आहे की, या अधिकाऱ्याने इंधन दर कमी अधिक होण्याची कारणे आणि पार्श्वभूमी सांगितली असली तरी, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 पूर्वी इंधन दर कमी होतील की नाही याबाबत कोणतेही भाष्य केले नाही. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात पाठिमागच्या आठवड्यात क्रूड ऑईलच्या किमती 70 USD प्रति बॅरल इतक्या कमी झाल्या होत्या. ही घट डिसेंबर 2021 नंतर प्रथमच झाली होती. दरम्यान, पुढच्या काहीच काळात दर पुन्हा भडकले आणि ते गुरुवारी ते 74.58 USD प्रति बॅरल इतके झाले. (हेही वाचा, Sachin Ahir on petrol-diesel prices fell : 'इंधन दर कपात हा भाजपचा प्रत्येक निवडणूकीपूर्वीचा 'जुमला'', सचिन अहिर यांची टिका (Watch Video))
दरम्यान, आंतरराष्ट्रीय कच्चा तेल बाजारात झालेली घट पाहता भारतीय तेल बाजारात (रिफायनरी) त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ज्याचा परिणामी पेट्रोल आणि डिझेल यांसारख्या तेल दरात घट होण्यात होऊ शकतो. पाठिमागील काही दिवसांपासून सर्वसाधारण तेजी मंदी वगळता स्थिर असलेले इंधन दर आणखी खाली येण्याची नागरिकांना आशा आहे.
इंधनाचे दर नेहमीच अस्थितर असतात. कधी ते एका दिवस किंवा आठवड्यात झर्रकन कमी होता तर कधी ते त्याच वेगाने वरही जातात. परिणामी या तेल दरांनुसार स्थानिक महागाई, नागरिकांच्या खिशावरील आर्थिक भार नेहमीच दोलायमान स्थितत राहतो. इंधनाच्या वाढत्या दरांचा देशातील सर्वच घटकांवर प्रभाव पडतो. उत्पादन निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्चा मालाची वाहतूक वाढते परिणामी पक्का माल तयार झाल्यावर त्याच्या वाहतुकीचाही दर वाढतो. सहाजिकच विक्रेत्यास ते चढ्या भावाने खरेदी करुन विकावे लागतात. त्याचा बोजा ग्राहकांवर पडतो. ग्राहकांना त्यांच्या आवश्यक वस्तू महाग दराने खरेदी कराव्या लागता. सामान्य ग्राहकांसाठी ही महागाई परवडणारी नसते. त्याचे सगळे आर्थिक गणीत बिघडून जाते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)