Petrol Diesel Price Hike in Maharashtra: लॉकडाऊन काळात महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल दर वाढ; VAT वाढवल्याने ग्राहकांच्या खिशावर भार
या वेळी राज्यात हरित निधी उभारण्यासाठी राज्यात पेट्रोल, डिझेल दरवाढ केली जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले होते.
राज्य सरकारने पेट्रोल, डिझेल दरावर आकारण्यात येणारा मूल्यवर्धित कर (Value added Tax ) अधिभार वाढवला आहे. त्यामुळे राज्यातील पेट्रोल, डिझेल दरात प्रति लिटर दोन रुपये अशी वाढ झाली आहे. वाढीव दर आजपासून (1 जुन 2020) लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने VAT वाढवून पेट्रोल, डिझेल दरावर अधिभार वाढविण्याचा निर्णय या आधी मार्च महिन्यात घेतला होता. तेव्हा पेट्रोल, डिझेल तर प्रति लिटर 1 रुपयांनी महागले होते. दरम्यान, महाराष्ट्र वगळता देशातील इतर राज्यात सर्वसाधारणपणे हे पेट्रोल, डिझेल दर स्थिर आहेत.
मुंबई-पुणे पट्रोल, डिझेल दर |
||
शहर | पेट्रोल दर (प्रतिलिटर) | डिझेल दर (प्रतिलिटर) |
मुंबई | 78.32 रुपये | 68.21 रुपये |
पुणे | 78.09 रुपये | 66.99 रुपये |
महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल दर मोठ्या प्रमाणावर वाढले असले तरी, देशातील इतर राज्ये आणि प्रमुख शहरांमध्ये हे दर स्थिर असल्याचे प्रसारमाध्यमांनी आपल्या वृत्तात म्हटले आहे. कोरोना व्हायरस संकटामुळे राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे उद्योग व्यवसाय आणि अत्यावश्यक सेवा वगळता वाहतूकही ठप्प आहे. त्यामुळे राज्याला मोठ्या प्रमाणावर महसूली तुटीचा सामना करावा लागत आहे. राज्यात सध्या पाचवा लॉकडाऊन सुरु झाला आहे. अशात राज्याच्या उत्पन्नात महत्त्वाचा असलेला कर महसूल आटला आहे. त्यामुळे राज्य सरकारने पेट्रोल, डिझेल दरवाढ केली आहे. (हेही वाचा, LPG Cylinder Price Hike: घरगुती एलपीजी सिलेंडर आजपासून महागणार; जाणून घ्या नवे दर)
देशभरातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल, डिझेल दर स्थिर |
||
शहर | पेट्रोल दर (प्रतिलिटर) | डिझेल दर (प्रतिलिटर) |
दिल्ली
|
71.26 रुपये | 69.39 रुपये |
चेन्नई
|
75.54 रुपये | 68.22 रुपये |
कोलकाता | 73.30 रुपये | 65.62 रुपये |
दरम्यान, या आधीही देशभरातील अनेक राज्यांनी लॉकडाऊन काळात पेट्रोल, डिझेल दरवाढ केली होती. खुद्द केंद्र सरकारनेही पेट्रल, डिझेलवरील उत्पादन शुल्कल अनुक्रमे 10 आणि 13 रुपये असे वाढवले होते. मार्च महिन्यात पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या सरकारचा अर्थसंकल्प विधिमंडळासमोर मांडला. या वेळी राज्यात हरित निधी उभारण्यासाठी राज्यात पेट्रोल, डिझेल दरवाढ केली जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले होते. दरम्यन, पेट्रोल, डिझेल दरात 2 रुपयांची वाढ केल्याने राज्याला प्रतिमहिना 500 कोटी रुपये इतका अतिरिक्त महसूल प्राप्त होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.