आज पेट्रोल 14 पैसे तर डिझेलमध्ये 11 पैशांची घट
आजसुद्धा पेट्रोल 14 पैसे आणि डिझेल 11 पैशांनी स्वस्त झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलची किंमत सातत्याने कमी होताना दिसून येत आहे. त्यामुळे आजसुद्धा पेट्रोल 14 पैसे आणि डिझेल 11 पैशांनी स्वस्त झाले आहे.
आज मुंबईमध्ये पेट्रोलसाठी प्रति लिटर 82.80 रुपये तर डिझेलसाठी 75.53 रुपये ग्राहकांना द्यावे लागणार आहेत. तर नवी दिल्लीमध्ये पेट्रोल 15 आणि डिझेल 10 पैशांनी कमी झाले आहे. तसेच दिल्लीत पेट्रोलसाठी 77.28 आणि डिझेलसाठी 72.09 प्रति लिटरने मिळणार आहे.
गेले दोन महिने कच्च्या तेलाचे भाव खूप वाढले होते. मात्र आता काही प्रमाणात स्वस्त झाल्याचे दिसून येत आहे. तर इंधनांच्या किंमतीत घट करण्यास सरकारने 18 ऑक्टोंबरपासूनच सुरुवात केली होती. तसेच पाच राज्यांतील निवडणुकांच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहे. त्याचे पडसाद म्हणून आता पासून इंधन दर कमी करण्यात येत असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.