नातेवाईकांकडून महिलेला विवस्त्र करुन मारहाण; औरंगाबाद येथील घटना
मात्र, तिथेही तक्रार दाखल करुण घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. या प्रकरणात अद्याप कोणावरही कारवाई केल्याचे वृत्त नाही.
औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील सिल्लोड (Sillod) येथे एका महिलेला विवस्त्र करुण मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. जमिनिच्या वादातून हा प्रकार घडला. महिलेला मारहाण करणारे लोक हे तिचे नातेवाईकच असल्याचे समजते. दरम्यान, आपल्यावर झालेल्या अन्याविरुद्ध दाद मागण्यासाठी आपण आपल्य आईसोबत पोलिस ठाण्यात गेलो. मात्र, तिथेही तक्रार दाखल करुण घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. या प्रकरणात अद्याप कोणावरही कारवाई केल्याचे वृत्त नाही.
प्राप्त माहितीनुसार, ज्या जमिनीचा वाद आहे ती जमीन पीडितेच्या आईच्या नावावर आहे. या जमिनीवर पीडितेच्या काकांचा डोळा आहे. त्यामुळे पीडिता आणि तिच्या आईला या जमिनीमध्ये यायला विरोध करण्यात येत आहे. आपण या जमिनीवर प्रवेश करण्यासाठी गेलो असता आपल्याला तेथून पिटाळून लावल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. दरम्यान, या जमिनीवर प्रवेश करताना आपल्याला विवस्त्र करुन मारहाण करण्यात आली. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी आपल्याला कपडे देण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही विरोध करण्यात आला, असे पीडितेने म्हटले आहे. धनंजय वाघ, मुरलीधर वाघ, बाबुराव वाघ आणि रामदास वाघ अशी आरोपींची नावे आहेत. (हेही वाचा, बलात्कार करताना व्हिडिओ बनवून पीडितेशी मंदिरात विवाह, हुंड्याच्या नावाखाली 10 लाख रुपयांची मागणी)
पीडिता सिल्लोड ग्रामीण पोलिसात होमगार्ड पदावर काम करते. आपल्यावरील अन्याविरुद्ध दाद मागण्यासाठी आपण सिल्लोड पोलिसांत गेलो. मात्र, तिथेही तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. या विरोधात आपण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचे पीडितेने म्हटले आहे.