दारु पिऊन गाडी चालविली, पादचारी तरुणाचा मृत्यू

फोटो सौजन्य- फाइल इमेज

दारुच्या नशेत गाडी चालवत असलेल्या एका वाहन चालकाने 22 वर्षीय तरुणाला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव येथे घडली आहे. तसेच पोलिसांनी या दारुड्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

राजऋषि गांगुली असे या आरोपीचे नाव आहे. गोरेगाव येथील एसवी रोड येथून गांगुली हा भरदिवसा दारुच्या नशेत गाडी चालवत होता. त्यावेळी तेथील रस्त्यावरुन चालत जाणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणाला गांगुलीने जोरात धडक दिली. या घटनेमध्ये तरुण गंभीर जखमी झाला. तर रस्त्यावरील स्थानिक नागरिकांनी त्या तरुणाला त्वरीत उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या सर्व घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी आरोपी गांगुली याला अटक केली आहे. तर आरोपीची वैद्यकिय तपासणी झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement