Payal Tadvi Suicide Case: पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टरांना पुढील शिक्षण घेण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
महाराष्ट्र सरकारने याचिकाकर्त्यांना विरोध करत म्हटले होते की, जो पर्यंत या प्रकराची सुनावणी होत नाही तोपर्यत आरोपींना पुढील शिक्षणाची परवानगी मिळू नये.
सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) पायल तडवी आत्महत्या प्रकरणी (Payal Tadvi Suicide Case) तीन महिला डॉक्टर्सना पुढील शिक्षण पूर्ण करण्यास परवानगी दिली आहे. न्यायलायाने हा निर्णय गुरुवारी दिला. पायल तडवी ही वैद्यकीय शिक्षण घेणारी विद्यार्थीनी होती. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश काहीसा शिथील करत हा नर्णय दिला. उच्च न्यायालयाने या तीनही डॉक्टरांना सशर्थ जामीन देत म्हटले होते की, त्यांना पुढील शिक्षण पूर्ण करता येणार नाही. आरोपींच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून हा निर्णय दिल्याचेही न्यायालयाने सांगितले.
सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती यू यू ललित यांच्या अद्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले की, या डॉक्टरांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी मान्यता द्यायला हवी. या काळात ते साक्षीदारांना कोणत्याही प्रकारे प्रभावित करणार नाहीत. आरोपींना ट्रायल कोर्टासमोर प्रत्येक तारखेला उपस्थित राहावे लागेल. (हेही वाचा, डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आरोपी महिला डॉक्टर्सना पदव्युत्तर शिक्षण घेता येणार नाही, मुंबई हायकोर्टाने सुनावला निर्णय)
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत आरोपी डॉक्टरांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. महाराष्ट्र सरकारने याचिकाकर्त्यांना विरोध करत म्हटले होते की, जो पर्यंत या प्रकराची सुनावणी होत नाही तोपर्यत आरोपींना पुढील शिक्षणाची परवानगी मिळू नये.
दरम्यान, न्यायालयाने म्हटले की, या प्रकरणात जर आरोपी निर्दोश सिद्ध झाले आणि सुनावणी दरम्यान त्यांना जर पुढील शिक्षणाची परवानगी नाकारण्यात आली तर त्यांचे करिअर संपुष्टात येईल. त्यामुळे आरोपींच्या भविष्याचा निर्णय विचारात घेऊन न्यायालयाने आरोपींना पुढील शिक्षण घेण्यास परवानगी देण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
मुंबई येथील नायर हॉस्पिटल (Nair Hospital) मधील शिकाऊ डॉक्टर पायल तडवी (Payal Tadvi) हिने आत्महत्या गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात नायर हॉस्पिटलमधील तीन महिला डॉक्टर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या पायल तडवी हिला या रुग्णालयातील डॉक्टर जातीवाचक टीप्पणी करत असत. तसेच, मनभंग होईल असे वारंवार बोलत असत. सततच्या या छळाला कंटाळून पायल तडवी हिने आत्महत्या केली, असा या महिला डॉ्टरवर आरोप आहे.