Patoda Gram Panchayat: भास्करराव पेरे पाटील यांच्या कन्या अनुराधा पेरे पाटील यांचा पराभव; पाटोदा ग्रामपंचायत निवडणुकीत धक्कादायक निकाल

अनुराधा पेरे पाटील यांना दुर्गेश खोकड यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागलाआहे. अनुराधा पेरे पाटील यांना 186 मतं तर दुर्गेश खोकड यांना 204 मतं मिळाली.

Bhaskarrao Pere Patil | (Photo Credits: Facebook)

राज्यभरात दबदबा असलेल्या पाटोदा ग्रामपंचायत निवडणुकीत धक्कादायक निकाल आला आहे. पाटोदा गावाला राज्यभर ओळख मिळवून देणाऱ्या भास्करराव पेरे पाटील यांच्या कन्या अनुराधा पेरे पाटील ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झाल्या आहेत. अनुराधा पेरे पाटील यांना दुर्गेश खोकड यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागलाआहे. अनुराधा पेरे पाटील यांना 186 मतं तर दुर्गेश खोकड यांना 204 मतं मिळाली.

अनुराधा पेरे पाटील यांचा पराभव धक्कादायक मानला जात आहे. अनुराधा यांचे वडील भास्करराव पेरे पाटील हे गेली 25 वर्षे सरपंच म्हमून कार्यरत आहेत. त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील एक गाव इतकीच ओळख असलेल्या पाटोदा या गावास राज्यभर ओळख मिळवून दिली. गावकऱ्यांनीही भास्कररावांवर जोरदार विश्वास दाखवला त्यांना 25 वर्षे सरपंच म्हणून काम करण्याची संधी दिली.

दरम्यान, या वेळी भास्करराव पेरे पाटील यांनी पाटोदा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी स्वत:चे पॅनल उभा केले नाही. आपले वय आता 60 वर्षे झाले आहे. त्यामुळे गावच्या राजकारणातून आपण निवृत्ती घेत आहोत. माझ्या ठिकाणी आणखी कोणी चांगले काम करु शकेल, अशी भूमिका घेत पेरे पाटील यांनी या वेळी निवडणूक लढवली नव्हती. ते या निवडणुकीतून दूर होते. मात्र, त्यांच्या कन्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. (हेही वाचा, Maharashtra Gram Panchayat Elections Results 2021: ग्रामपंचायत निवडणूक निकाल, गावगाड्यात कुणाचं वर्चस्व? आज चित्र होणार स्पष्ट)

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पोपटराव पवार यांचे हिवरे बाजार, ज्येष्ठ समाजसेवक अण्णआ हजारे राळेगणसिद्धी आणि सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्या पाटोदा या तीन ग्रामपंचायतींकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. या तीन्ही गावांमध्ये 20 ते 30 वर्षांमध्ये ग्रामपंचायत निवडणूका न होता बिनविरोध निवडी होत होत्या. दुसऱ्या बाजूला हिवरे बाजार येथे पोपटराव पवार यांच्यासह त्यांच्ये संपूर्ण पॅनल मोठ्या फरकाने निवडूण आले आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायतींसाठी पार पडले मतदान?

ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.



संबंधित बातम्या

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील

IND W Beat WI W 1st T20I Match Scorecard: पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 49 धावांनी केला पराभव, तीतास साधूची प्राणघातक गोलंदाजी

Delhi Assembly Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपने जाहीर केली 38 उमेदवारांची यादी; अरविंद केजरीवाल आणि आतिशी कोठून निवडणूक लढवणार? वाचा

MUM Beat BRD, SMAT 2024 Semi Final 1 Scorecard: मुंबईचा बडोद्यावर 6 विकेट्सने विजय; सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश, अंजिक्य रहाणेच्या शानदार 98 धावा