Passengers Eat Food On Tarmac: IndiGo आणि Mumbai Airport ला Bureau of Civil Aviation Security कडून कारणे दाखवा नोटीस

मुंबई विमानतळावर इंडिगोच्या विमानातून अनेक प्रवासी बाहेर आले त्यांनी tarmac वर बसून जेवण केले. रविवारी गोवा-दिल्ली फ्लाईट खराब वातावरणामुळे 12 तास उशिर झाल्याने मुंबई विमानतळावर वळवण्यात आले होते.

Union Minister Jyotiraditya Scindia (Photo Credit: ANI)

मुंबई विमानतळावर इंडिगो एअरलाईन्सचे (Indigo Airlines) प्रवासी tarmac वर जेवतानाचे व्हिडिओ वायरल झाल्यानंतर आता प्रशासन जागं झालं आहे. MoCA's Bureau of Civil Aviation Security कडून आज (16 जानेवारी) IndiGo आणि Mumbai Airport ला कारणे दाखवा नोटीशी पाठवण्यात आल्या आहेत. या प्रकरणी त्यांची बाजू देखील मागवून घेण्यात आली आहे. केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री Jyotiraditya Scindia यांनी घडल्याप्रकरणी काल मध्यरात्री तातडीची बैठक बोलावली होती.

नोटीशीनुसार, ब्युरोकडून अ‍ॅक्शन घेण्यासोबतच आज जर त्यांच्याकडून रिपोर्ट दाखल झाला नाही तर आर्थिक दंड देखील विमान कंपनीला आणि एअरपोर्टला बजावला जाऊ शकतो. Dinner On The Runway: इंडिगोच्या गोवा-दिल्ली फ्लाइटला उशीर झाल्यानंतर प्रवाशांनी रनवेवर विमानाशेजारी केले जेवण, व्हिडिओ व्हायरल (Watch Video) .

मुंबई विमानतळावर इंडिगोच्या विमानातून अनेक प्रवासी बाहेर आले त्यांनी tarmac वर बसून जेवण केले. रविवारी गोवा-दिल्ली फ्लाईट खराब वातावरणामुळे 12  तास उशिर झाल्याने मुंबई विमानतळावर वळवण्यात आले होते. त्यानंतर हा प्रकार घडला आहे. सोशल मीडीयात या घटनेचे व्हिडिओज वायरल होत आहेत.

BCAS ने जारी केलेल्या नोटिसांनुसार, इंडिगो आणि एमआयएएल या दोघांनीही परिस्थितीचा अंदाज घेण्यास आणि विमानतळावर प्रवाशांसाठी योग्य सोयीची व्यवस्था करण्याचा उत्साह नव्हता. सूत्रांनी सांगितले की, विमानाला कॉन्टॅक्ट स्टँडऐवजी रिमोट बे C-33 होते, एकच एअरक्राफ्ट पार्किंग स्टँड जे प्रवाशांना विमानात जाण्यासाठी आणि विमानातून जाण्यासाठी होते. यामुळे प्रवाशांच्या त्रासात आणखी भर पडली आणि टर्मिनलवर विश्रांती कक्ष आणि अल्पोपहार यासारख्या मूलभूत सुविधांचा लाभ घेण्यासही प्रवाशांना न मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now