Akasa Air Flight Emergency Landing: आकासा एअरच्या विमानात प्रवासी म्हणाला, 'माझ्या बॅगेत बॉम्ब आहे'; पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या फ्लाईटचे मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

यानंतर विमान तातडीने मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले.

Akasa Air Flight (PC - Wikipedia)

Akasa Air Flight Emergency Landing: काल रात्री पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या अकासा एअर (Akasa Air) च्या विमानाचे मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) इमर्जन्सी लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उड्डाण केलेल्या फ्लाइटमधील एका प्रवाशाने त्याच्या बॅगेत बॉम्ब असल्याचे सांगितल्यावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. यानंतर विमान तातडीने मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच प्रवासी आणि त्याच्या सामानाची तपासणी करण्यात आली. यानंतर प्रवाशाने पोलिसांना बॉम्ब ठेवण्यामागचे खरे कारण सांगितले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, काल रात्री 2.30 च्या सुमारास सीआयएसएफ अधिकारी वीरेंद्र सिंह यांनी मुंबई पोलिस नियंत्रणाच्या हॉट लाइनवर याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्या विमान प्रवाशाच्या सामानाची झडती घेण्यात आली. यावेळी बीडीडीएस टीम तसेच पोलीस अधिकारी तिथे उपस्थित होते. संशयित प्रवाशाच्या सामानाची कसून तपासणी केली असता, पोलिसांना एकही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. (हेही वाचा - Flight Emergency Landing: एअर इंडियाच्या विमानात अचानक तांत्रिक बिघाड, दुबईला जाणार्‍या विमानाचं कन्नूरमध्ये आपत्कालीन लँडिंग)

वास्तविक, ज्या व्यक्तीने त्याच्या बॅगेत बॉम्ब असल्याचे सांगितले होते. त्याला छातीत दुखत होते. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात नेण्यात आले. एका अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, त्या फ्लाइटमध्ये त्यांचा एक नातेवाईकही त्यांच्यासोबत प्रवास करत होता. नातेवाइकाने पोलिसांना सांगितले की, त्याच्या साथीदाराला छातीत वेदना होत असल्याने त्याने यासाठी औषधही घेतले होते. मात्र, त्याला जास्त त्रास होऊ लागला.

सर्व प्रकारचा तपास करून पोलिसांनी क्लिअरन्स दिला आणि त्यानंतर सकाळी 6 च्या सुमारास आकासा एअरचे विमान मुंबई विमानतळावरून दिल्लीला रवाना झाले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.