Parth Pawar Gets Y+ Security: अजित पवार यांचा लेक पार्थ पवार यांना निवडणूकीच्या धामधुमीत वाय प्लस दर्जाची सुरक्षा

अशात पवार कुटुंबामध्येही फूट पडली आहे. बारामतीकर आता कुणाच्या पाठिशी उभे राहणार हे पहाव लागणार आहे.

Ajit Pawar, Partha Pawar | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  यांचा लेक पार्थ पवार (Parth Pawar) यांना थेट वाय प्लस कॅटेगरीची सिक्युरिटी (Y+ Security) देण्यात आली आहे. देशात निवडणूकीची धामधूम सुरू असताना पोलिसंवर अधिक ताण आहे. अशात पार्थ पवारांना वाय प्लस कॅटेगरीची सिक्युरिटी दिली जात असताना चर्चा सुरू झाल्या आहेत. मीडीया रिपोर्ट्सनुसार, पार्थ पवार सध्या आई, सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचारसभा घेत आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन ते मतदारसंघातील नागरिकांसोबत संवाद साधत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे पोलीस आयुक्तांकडूननिवडणूकीच्या काळात महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढली जात असताना, राज्य शासनानेच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मुलाला वाय प्लस सुरक्षा दिल्याने चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसापुर्वी पत्र लिहून युगेंद्र पवार आणि रोहित पवार यांना सुरक्षा देण्याची मागणी केली होती. मात्र, आता सुरक्षा पार्थ पवारांना मिळाली आहे. पार्थ पवार हे मागील लोकसभा निवडणूकीमध्ये मावळ मधून लोकसभेत उभे राहिले होते मात्र त्यांना यश मिळवता आलं नव्हतं. श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवारांवर विजय मिळवला होता. यंदा पार्थ पवार आई सुनेत्रा पवारांसाठी मेहनत घेत आहेत.

बारामती मध्ये यंदा नणंद विरूद्ध भावजय म्हणजे सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार असा लढा सुरू आहे. अशात पवार कुटुंबामध्येही फूट पडली आहे. बारामतीकर आता कुणाच्या पाठिशी उभे राहणार हे पहाव लागणार आहे.



संबंधित बातम्या