Pariksha Pe Charcha 2.0 दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना PUBG बद्दल विचारला सवाल, मोदींनी दिले 'हे' उत्तर (Video)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी मंगळवारी (29 जानेवारी) परिक्षेपूर्वी विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा 2.0 या कार्यक्रमातून संवाद साधला.

PM Narendra Modi (Photo Credits-Twitter)

Pariksha Pe Charcha2.0: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी मंगळवारी (29 जानेवारी) परिक्षेपूर्वी विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा 2.0 या कार्यक्रमातून संवाद साधला. त्यावेळी विद्यार्थ्याना मोदींनी परिक्षबाबत ताणपासून कसे दूर रहावे याबद्दल सल्ला दिला. तसेच पालकांनीसुद्धा मुलांवर अभ्यासाबाबत दबाव न टाकता अभ्यासासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन दिले.

परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमादरम्यान तेथे उपस्थित असलेल्या एका विद्यार्थ्याच्या आईने मोदींनी हे PUBG काय आहे असा प्रश्न विचारला. त्यावेळी उपस्थित मंडळींनी हसण्यास सुरुवात केली. मात्र प्रश्न विचारण्यामागील कारण हे की, तिचा मुलगा इयत्ता 9 वी मध्ये शिकत असून त्याच्यावर ऑनलाईन गेम्समुळे विचलित होत आहे. (हेही वाचा-निवडणुकीपूर्वी EVM, VVPAT बनविणाऱ्या ECIL कंपनीला कोट्यावधीचा फायदा)

या प्रश्नावर मोदी यांनी उत्तर देत असे म्हटले की, PUBG काय आहे? ही एक समस्या आणि समाधान ही आहे. जर आपल्याला वाटत असेल आपली मुले तंत्रज्ञानापासून दूर राहावी तर ती मागे पडतील असे उत्तर त्यांनी दिले आहे.त्यातसोबत मोदी यांनी असे सांगितले की तंत्रज्ञानाबाबत मुलांशी चर्चा करावी. तंत्रज्ञानाचा उपयोग विस्तारासाठी झाला पाहिजे. तंत्रज्ञानाला प्रोत्साहन द्यायला हवे.

विद्यार्थ्यांच्या समस्या आणि ताणतणावाकडे पालकांनी दुर्लक्ष करु नये. तर ताणतणावापासून वाचण्यासाठी काऊंसिलिंगची गरज न भासता तुमच्या परिने प्रयत्न केले पाहिजेत. आई-वडिलांनी आणि शिक्षकांनी एकदुसऱ्या विद्यार्थ्यांमध्ये फरक करु नये. त्यामुळे मुलाच्या मानसिक स्थितीवर परिणाम होतो.