परभणी: प्रेमसंबंधाला नकार देणाऱ्या प्रेयसीचा खून; प्रियकर अटकेत

ही घटना परभणी (Parbhani) जिल्ह्यातील तट्टूजवळा तालुक्यात घडली. याप्रकरणी पोलिसांनी प्रियकराला अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

प्रेमसंबंधाला नकार दिल्यामुळे प्रियकरानेच आपल्या प्रेयसीचा खून केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही घटना परभणी (Parbhani) जिल्ह्यातील तट्टूजवळा तालुक्यात घडली. याप्रकरणी पोलिसांनी प्रियकराला अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. आपली प्रेयसी यापुढे प्रेमसंबंध ठेवणार नाही, हे समजताच आरोपीने मृत महिलेला उसाच्या शेतात नेऊन नारळ तोडण्याच्या शास्त्राने हत्या केली. रामपुरी शिवारीतील यादव यांच्या शेतात 8 फेब्रुवारी रोजी मृत महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यावेळी ग्रामस्थांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशीला सुरुवात केली होती.

संजय उर्फ पप्पू रमेश जोंधळे असे या घटनेतील आरोपीचे नाव आहे. संजय याचे उसतोड महिला कामगार महिलासोबत प्रेमसंबंध होते. यावरून संजय आणि मृत महिला यांच्यात वाद सुरू होता. यातून संजयने संबंधित महिलेला उसाच्या शेतात नेऊन नारळ तोडण्याच्या हत्याराने तिचा खून केला. मृत महिलेच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचे प्रेमसंबंध असल्याचे तापासात स्पष्ट झाले होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संजयला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली. त्यावेळी प्रेमसंबधातून त्याने महिलेचा खून केल्याची कबूली दिली. या घनटेमुळे आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. हे देखील वाचा-धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 21 वर्षीय तरुणीचा रिक्षात विनयभंग; स्वत:चा बचाव करण्यासाठी मुलीने मारली उडी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामपुरी शिवारीतील यादव यांच्या 8 फेब्रुवारी रोजी एका अज्ञात महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. अंगावरील साडी आणि चप्पलावरून ही महिला उसतोड कामगारांच्या टोळीतील हरवलेली महिला असल्याचे निष्पन्न झाले होते. तसेच खून झाल्यानंतर दोन दिवसांत पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात आली.