Pankaja Munde: मी भाजपा सोडून जाणार नाही; सोनिया आणि राहुल गांधी यांना भेटले नसल्याचे पंकजा मुंडे यांनी केल स्पष्ट

पुढचे दोन ते तीन महीने ब्रेक घेणार आहे आणि मी विचार करणार आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हंटलं आहे.

Pankaja Munde | (Photo Credit - Twitter)

भाजप नेत्या पंकजा मुंडे या लवकरच पक्ष सोडून राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश करतील अशी बातमी काही प्रसारमाध्यमांनी चालवली होती. याबाबत आज पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन या बातम्या खोट्या असल्याचे म्हटले आहे. तसेच ही बातमी चालवणाऱ्या माध्यमांविरोधात कारवाई करणार असल्याचे देखील पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेण्यावर पंकजा मुंडेंनी भूमिका स्पष्ट केली आहे. मी मी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची बातमी दाखवली मात्र ही बातमी चुकीची असल्याचे त्यांनी म्हटले.  (हेही वाचा - Pankaja Munde-Dhananjay Munde: दूर झाली कटूता! राज्याच्या मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी केलं धनंजय मुंडेंचं औक्षण (Watch Video))

मी काँग्रेसच्या वाटेवर आहे, अशा बातम्या चालवण्यात आल्या. कोणत्याही बातमीवर प्रश्नचिन्ह टाकून कायदेशीर प्रश्न सोडवू शकता. माध्यमांना कोणतीही बातमी देताना स्त्रोत देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या चॅनेल्सवर मानहानीचा दावा ठोकणार आहे,” अशी माहिती भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी पक्षात आपण नाराज असल्याचे देखील संकेत दिले आहे. प्रत्येक वेळी कोणत्याही पदासाठी आपले नाव पुढे येते पण ते पद मिळत नाही त्यावर पक्षाने भूमिका स्पष्ट करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.

मी जे राजकारण पाहून जे आदर्श समोर ठेवून मी राजकारणात आले, त्याच्याशी मला तडजोडी कराव्या लागत असतील तर मी राजकारणात जेव्हा जेव्हा मला प्रतारणा करावी लागेल तेव्हा मी राजकारणातून बाहेर पडायला मागे पुढे पाहणार नाही,आता मला ब्रेकची आवश्यकता आहे आणि तो मी घेणार आहे. पुढचे दोन ते तीन महीने ब्रेक घेणार आहे आणि मी विचार करणार आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हंटलं आहे.