Pandharpur Karad Road Accident: सांगोल्यात भीषण अपघात; 5 महिला जागीच ठार, 3 गंभीर जखमी
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक माहितीनुसार, चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं समोर आलेय. अपघातील मृत आणि जखमी महिला सांगोल्यातील कटफळ येथील रहिवासी आहेत.
सांगोळ्यात पंढरपूर -कराड रोडवरील कटफळ या ठिकाणी भीषण रस्ते अपघात झाला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिलांना धडक दिली. यामध्ये पाच महिलांचा जागीच मृत्यू झालाय. तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांना उपचारासाठी पंढरपूरला शिफ्ट कऱण्यात आलेय. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे, पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. ग्रामस्थांनी ट्रक चालकास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. दोन दिवसांपूर्वी नागपूरमध्ये एका भरधाव कारने 9 मजुरांना चिरडल्याची घटना घडली होती. या अपघाताचे प्रकरण ताजे असतानाच सांगोल्यामधून एक भयंकर दुर्घटना समोर आली आहे. (हेही वाचा - Chhatrapati Sambhajinagar: कीटकनाशक फवारताना विषबाधा होऊन तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना)
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक माहितीनुसार, चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं समोर आलेय. अपघातील मृत आणि जखमी महिला सांगोल्यातील कटफळ येथील रहिवासी आहेत. या महिला मोलमजुरीचे काम करण्यासाठी चिकमहूद येथील शेतकऱ्यांच्या शेतावर गेल्या होत्या. काम संपल्यानंतर दुपारी घरी जाण्यासाठी त्या पंढरपूर - कराड रोडवर एसटीची वाट पाहत थांबल्या होत्या. त्याचवेळी पंढरपूरकडून भरधाव जाणाऱ्या ट्रकने त्यांना उडवले.
या भयंकर अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज दुपारी चार वाजता हा भीषण अपघात झाला. आयशर ड्रायव्हरचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने थेट या सातही महिलांना चिरडले. या सर्व महीला या कटफळ येथील रहिवासी आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Jun 18, 2024 06:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

