Palghar: बाईकच्या चाकात ओढणी अडकून महिलेचा मृत्यू

दुचाकीवरुन प्रवास करताना गळ्याती ओढणी चाकात अडकल्याने महिलेला फास लागून तिचा अपघाती मृत्यू झाला. घटनेत मृत्यमुखी पडलेली महिला मुंबई येथील कांदिवली परिसरात राहणारी होती.

Accident (PC - File Photo)

Bike Accident in Palghar: निष्काळजीपणाने घडलेली छोटीशी चूकही किती महागात पडू शकते हे दाखवणारी घटना पालघर जिल्ह्यात घडली आहे. दुचाकीवरुन प्रवास करताना पाठिमागे बसलेल्या 27 वर्षीय महिलेचा धक्कादायक मृत्यू झाला आहे. दुचाकीवरुन प्रवास करताना गळ्याती ओढणी चाकात अडकल्याने महिलेला फास लागून तिचा अपघाती मृत्यू झाला. घटनेत मृत्यमुखी पडलेली महिला मुंबई येथील कांदिवली परिसरात राहणारी होती. प्रतिमा यादव असे त्यांचे नाव असून आपल्या पतीसोबत त्या वसई परिसरात देवदर्शनासाठी आल्या होत्या. दरम्यान, ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी सकाळी घडली. वसईनजिकच्या महामार्गावरील बापाणे गावाजवळून जाताना प्रतिमा यादव यांची ओढणी पतीच्या दुचाकीच्या मागच्या चाकात आडकली. त्यामुळे त्यांच्या गळ्याला फास लागला आणि त्या दुचाकीवरुन खाली पडल्या. ज्यामुळे त्यांना गंभीर मार लागला आणि त्या जखमी झाल्या

दुचाकीवरुन पडल्या-पडल्या लगेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या यादव यांना डॉक्टरांनी उपचारास सुरुवात केली. मात्र, उपचारापुर्वीच त्या मृत झाल्याचे घोषीत केले मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये महिलांनी साडी नेसणे आणि ओढणी, दुपट्टा घेणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे. असे असले तरी त्यामुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाणही मोठे आहे. खास करुन दुचाकीवरुन जाताना झालेल्या अनेक अपघातांमध्ये दुपट्टाच कारणीभूत असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. पाठिमागच्या सीटवर बसल्यानंतर अनेकदा महिलांना आपला दुपट्टा चाकाजवळ गुटमळतो आहे याचे भान नसते. परिणामी कधीतरी हा दुपट्टा चुकून चाकात अडकतो आणि अपघात घडतो. या अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाण जसे अधिक आहे तसेच, मोठ्या प्रमाणावर जखमी होण्याचेही आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif