Palghar Lynching: पालघर येथे जूना आखाड्यातील दोन साधू व त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणी, BJP कडून उच्च स्थरीय चौकशीची मागणी, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

या मारहाणीमध्ये या तीनही जणांचा मृत्यू झाला आहे

BJP Leader Devendra Fadnavis | (Photo Credits: IANS)

लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान पालघर (Palghar) मधील एका गावाजवळ ग्रामस्थांच्या मोठ्या जमावाने तीन जणांना बेदम मारहाण (Mob Lynching) केली होती. या मारहाणीमध्ये या तीनही जणांचा मृत्यू झाला आहे. आता तीन दिवसांनंतर विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने (BJP) या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ही पालघर येथील मॉब लिंचिंगची घटना धक्कादायक आणि अमानवीय असल्याचे म्हटले आहे. एकीकडे कोरोना विषाणूशी, लॉक डाऊनशी आपण लढा देत आहोत अशा परिस्थितीमध्ये ही मारहाणीची घटना भयंकर आहे, असेही ते म्हणाले.

या मारहाणीमध्ये मरण पावलेल्या लोकांमध्ये जूना आखाड्यातील दोन साधूंचा समावेश आहे. यामध्ये दोन पोलिस व्हॅनचीही तोडफोड झाली आहे आणि काही पोलिस जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली, परंतु ड्राईव्हरने तेथील पोलिसांना या बाबत माहिती दिल्यानंतर शुक्रवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला.

याबाबत फडणवीस म्हणाले, 'ही घटना अतिशय गंभीर आणि निंदनीय आहे. यामध्ये सर्वात भयंकर हे आहे की, पोलिसांसमोर जमावाने या लोकांना मारहाण केली आहे. पोलिसांच्या समोर लाठीहल्ला होतो आणि पोलीस काहीच करू शकत नाही, ही शरमेची बाब आहे. या घटनेची महाराष्ट्र सरकारने तातडीने उच्चस्तरीय चौकशी सुरु करावी आणि यासाठी जबाबदार असणाऱ्या लोकांना कठोर शिक्षा करावी. तसेच पोलिस याबाबतीत काहीच का करू शकले नाहीत याचेही उत्तर मिळायला हवे.'

मुंबई भाजपचे सरचिटणीस अमरजित मिश्रा (Amarjeet Mishra) यांनीही आरोप केला आहे की, 'हा हल्ला होत असतना पोलीस शांत राहिले. त्यामुळे सरकारने या घटनेच्या मुळापर्यंत पोहोचावे आणि असंवेदनशील पोलिसांना बडतर्फ केले जावे.'

दरम्यान, पीडित लोक नाशिकहून इको व्हॅन मधून सुरतकडे मदत साहित्य घेऊन प्रवास करीत होते. दाभाडी-खानवेल रोडवर जवळजवळ लॉक डाऊन मोडून 200 आदिवासींच्या जमावाने त्यांचे वाहन अडवले. चोर समजून जमावाने या तीनही लोकांची चौकशी मात्र त्यानंतर या तिघांना मारहाण करायला सुरुवात केली. जमावाने या तिघांवर लाठी, रॉड आणि दगडांनी पाशवी हल्ले केले. पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या तिघांनाही आपल्या व्हॅनमध्ये नेले, त्यानंतरही जमावाने पोलिस व्हॅनची तोडफोड केली व तिघांना मरेपर्यंत मारहाण केली. (हेही वाचा: पालघर येथे आदिवासी जमावाने चोर समजून केलेल्या मारहाणीत तीन जणांचा मृत्यू; मरण पावलेल्यांमध्ये दोन साधूंचा समावेश)

मृत्यू पावलेल्या व्यक्तींमध्ये सुशीलगिरी महाराज (वय 30), चिकणे महाराज कल्पवृक्ष गिरी (वय 70) आणि त्यांचा चालक निलेश तेलवडे (वय 30) यांचा समावेश आहे,  याबाबत कासा पोलिस ठाण्यात शुक्रवारी उशिरा गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर 100 हून अधिक जणांना अटक केली. सध्या हे लोक पोलीस कोठडीत असून, पुढील तपास सुरू आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif