Palghar Earthquake Tremors: पालघर मध्ये स्थानिकांना पुन्हा एकदा भुकंपाचे धक्के
पालघर येथे शुक्रवारी (1 फेब्रुवारी) रोजी पालघर, तलासरी, डहाणू या भागात एकाच दिवसात पाच वेळा भुकंपाचे हादरे बसले होते. यामुळे स्थानिक नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण होऊन जिल्ह्याला बसलेल्या हादरांमुळे चिंता वक्त करत होते. मात्र शुक्रवारी पुन्हा एकदा भुकंपाचे हादरे स्थानिकांना जाणवले आहेत.
Palghar Earthquake Tremors: पालघर येथे शुक्रवारी (1 फेब्रुवारी) रोजी पालघर, तलासरी, डहाणू या भागात एकाच दिवसात पाच वेळा भुकंपाचे हादरे बसले होते. यामुळे स्थानिक नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण होऊन जिल्ह्याला बसलेल्या हादरांमुळे चिंता वक्त करत होते. मात्र शुक्रवारी पुन्हा एकदा भुकंपाचे हादरे स्थानिकांना जाणवले आहेत. तसेच 3.3 रिश्टर स्केल भुकंपाची नोंद करण्यात आली आहे.
या परिसरातील स्थानिकांना वारंवार भुकंपाच्या हादरामुळे भीती वाटू लागली आहे. त्यामुळे भुकंपग्रस्त नागरिकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्याचसोबत भुकंपमापक यंत्रणा प्रशासनाकडून बसवण्यात आली आहे. (हेही वाचा-Palghar Earthquake Tremors: पालघर येथे 6 वेळा भुकंपाचे हादरे बसलेल्या घटनेत एका चिमुरडीचा मृत्यू)
जिल्ह्याला बसलेल्या हादरांमुळे घाबरुन घराबाहेर पळत सुटटेल्या चिमुरडीचे डोके मोठ्या दगडावर आपटून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. तसेच डहाणू येथे वारंवार भूकंपाचे हादरे बसत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Feb 08, 2019 01:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

