Palghar Earthquake Tremors: पालघर परिसरात पुन्हा 2.6 रिश्टर स्केलचा भूकंप, 24 तासात पाचवा धक्का

आज सकाळी पालघर परिसरात चा भूकंपाचा धक्का बसला होता. काल रात्रीपासून पालघर नजीकच्या परिसरात भूकंपाचे धक्के बसायला पुन्हा सुरूवात झाली आहे.

Palghar Earthquake Tremors: पालघर परिसरात पुन्हा  2.6 रिश्टर स्केलचा भूकंप, 24 तासात पाचवा धक्का
Palghar Earthquake (Photo Credits: Twitter)

पालघरमध्ये (Palghar) आज सकाळी सातच्या सुमारास आणि आता पुन्हा दिवसभरातील दुसरा भूकंपाचा धक्का बसला आहे. आज दुपारी 2.12 च्या सुमारास पालघर नजिक तलासरी(Talasari) आणि डहाणू (Dahanu) भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. पालघरला बसलेला आजचा दुसरा भूकंपाचा धक्का 2.6 रिश्टर स्केलचा आहे.  Palghar Earthquake Tremors: पालघर, डहाणू, तलासरी भागात पुन्हा भूकंपाचे धक्के; रात्रीपासून 3 वेळा हादरला परिसर

ANI Tweet

आज सकाळी पालघर परिसरात चा भूकंपाचा धक्का बसला होता. काल रात्रीपासून पालघर नजीकच्या परिसरात भूकंपाचे धक्के बसायला पुन्हा सुरूवात झाली आहे. हे धक्के सौम्य स्वरूपाचे असल्याने जीवित अथवा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही.

(The above story first appeared on LatestLY on May 12, 2019 04:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).