पालघर जिल्ह्यात भुकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पालघर येथे आज (20 सप्टेंबर) तलासरी, डहाणू, दापचरी भागात संध्याकाळच्या वेळेला भुकंपाचे धक्के बसले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच भुकंपामुळे काही घरांना तडे गेल्याचे ही सांगण्यात येत आहे.

पालघर जिल्ह्यात भुकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

Palghar Earthquake: पालघर येथे आज (20 सप्टेंबर) तलासरी, डहाणू, दापचरी भागात संध्याकाळच्या वेळेला भुकंपाचे धक्के बसले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच भुकंपामुळे काही घरांना तडे गेल्याचे ही सांगण्यात येत आहे.

यापूर्वी सुद्धा पालघर, तलासरी, डहाणू या भागात एकाच दिवसात पाच वेळा भुकंपाचे हादरे बसले होते. तसेच 3.3 रिश्टर स्केल भुकंपाची नोंद करण्यात आली होती. मात्र या परिसरातील स्थानिकांना वारंवार भुकंपाच्या हादरामुळे भीती वाटू लागली आहे. त्यामुळे भुकंपग्रस्त नागरिकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्याचसोबत भुकंपमापक यंत्रणा प्रशासनाकडून बसवण्यात आली असल्याचे सांगण्यात आले होते.(Palghar Earthquake Tremors: पालघर, तलासरी, डहाणू मध्ये भूकंप; 3.2 रिश्टल स्केलच्या धक्क्यांनी हादरला परिसर)

पालघर जिल्ह्याला भुकंपामुळे बसलेल्या हादरांमुळे घाबरुन घराबाहेर पळत सुटटेल्या चिमुरडीचे डोके मोठ्या दगडावर आपटून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. तसेच डहाणू येथे वारंवार भूकंपाचे हादरे बसत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे बोलले जात होते.

मार्च महिन्यात सुमारे 4.3 रिश्टल स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. हा धक्का पाच मीटर खोल असल्याची माहिती देण्यात आली होती.  पालघरमध्ये भूकंपाचे धक्के  नागरिकांना सातत्याने जाणवत असल्याचे सांगण्यात आले होते.

(The above story first appeared on LatestLY on Sep 20, 2019 06:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).