Palghar News: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर ट्रक कोसळला, कोणतीही जीवितहानी नाही
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील (NH 8) पालघर येथील चारोटी पुलावर कंटेनर ट्रक पलटी झाला.
Palghar News: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील (NH 8) पालघर येथील चारोटी पुलावर कंटेनर ट्रक पलटी झाला. परिणामी कंटेनरमधील माल महामार्गाच्या सर्व्हिस साइड रोडवर पडला. रस्त्यावर माल पडल्यामुळे वाहतुक कोंडी झाली. काही तासांतच वाहतूक कोंडी दूर करण्यात आली असून सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. 17 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजता डहाणू तालुक्यातील चारोटी पुलावर NH 8 वरून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर ट्रक खाली कोसळला. पोलीसांनी या घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटना स्थळी दाखल झाले.
वाहन महामार्गाच्या डाव्या लेनमध्ये होते आणि पुलावरील अपघातामुळे कंटेनर पडलेल्या अवस्थेत सापडला होता. कंटेनरमधील माल, बहुतांश प्लास्टिक कच्चा माल, पुलाच्या बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडवर पडला. त्यामुळे काही काळ इतर वाहतुक बंद ठेवण्यात आली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहतुक कोंडी झाली. सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ट्रकमधील चालक, क्लिनर आणि अन्य दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले. पीआय नामदेव बंडगर यांच्या नेतृत्वाखाली कासा पोलिसांच्या पथकाने वाहतूक सुरळीत करून रस्त्यावरील अडथळे दूर केले. महामार्गाच्या या विभागातील सर्व लेन आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित आहे.रस्त्यावर पडलेला कच्चा मालही उचलला जात आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात घडून आला आहे. असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.