IPL Auction 2025 Live

Padma Shri Award: राहीबाई सीमा पोपरे यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव, जाणून घ्या महाराष्ट्रातील 'Seed Mother' यांच्याबद्दल अधिक

राहीबाई यांना बीजमाता (Seed Mother) म्हणून ओळखले जाते.

Rahibai Popare (Photo Credits-ANI)

Padma Shri Award: देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शेती विभागातील महाराष्ट्रातील आदिवासी शेतकरी राहीबाई सोमा पोपरे (Rahibai Soma Popere) यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. राहीबाई यांना बीजमाता (Seed Mother) म्हणून ओळखले जाते. पोपरे या शेतकरी असून त्या महादेव कोळी या आदिवासी जमातीमधील शेतकरी आहेत.(Padma Shri Award 2020: सुषमा स्वराज, अरुण जेटली, जॉर्ज फर्नांडीस यांना मरणोत्तर पद्मविभूषण)

रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राहीबाई पोपरे यांना शेतीसाठी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. यासंदर्भात राष्ट्रपती भवानाकडून ट्विट ही करण्यात आले आहे. पद्मश्री पुरस्काराचा सोहळा हा सोमवारी राष्ट्रपती भवनावर पार पडला.

तर राहीबाई पोपरे यांना सीड मदर म्हणून ओळखले जाते. त्यांच्या कामगिरी बद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी जैविक शेतीला एका नव्या स्तरावर नेऊन ठेवले आहे. 57 वर्षीय पोपरे या स्वयं सहाय्यता समूहाच्या माध्यमातून 50 एकर जमीनीवर 17 हून अधिक देशी पिक पिकवतात. दोन दशकांपूर्वी त्यांनी बिया एकत्रित करणे सुरु केले होते. आज त्या स्वयं सहाय्यता समूहाच्या माध्यमातून शेकडो शेतकऱ्यांना एकत्रित करुन वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या आधारावर जैविक शेती करतात.

Tweet:

Tweet:

पद्म पुरस्कार हा दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केल्या जाणार्‍या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहे. हा पुरस्कार तीन विभागात दिला जातो. त्यामध्ये पद्म विभूषण, पद्म भुषण आणि पद्मश्री पुरस्काराचा समावेश आहे.