IPL Auction 2025 Live

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले भाजी लिलाव मंडईची स्थापना

या सभेत मार्केट यार्ड मधील लिलाव भाजी मंडईला समाज सुधारक स्त्री शिक्षणाचे जनक "क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले" ) यांचे नाव देण्यात आले. त्या बाबतचा ठराव आज प्रशासकीय मंडळाच्या सभेमध्ये मंजूर करण्यात आला.

APMC Pachora | (File Photo)

कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य कार्यालय पाचोरा (Pachora Agricultural Produce Market Committee) येथे आज दिनांक २८ रोजी दुपारी प्रशासकीय मंडळाची सभा पार पडली. या सभेत मार्केट यार्ड मधील लिलाव भाजी मंडईला समाज सुधारक स्त्री शिक्षणाचे जनक "क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले" (Krantisurya Mahatma Jyotiba Phule) यांचे नाव देण्यात आले. त्या बाबतचा ठराव आज प्रशासकीय मंडळाच्या सभेमध्ये मंजूर करण्यात आला.

कृषी उत्पन्न बाजार समिती येथे असलेल्या मार्केटयार्ड मधील लिलाव भाजी मंडई पाचोरा येथे दैनंदिन भाजीपाला विक्रीचा लिलाव भरतो तालुक्यातील, जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शेतातील पिकलेला भाजीपाला आणून या मार्केटमध्ये सर्व व्यापाऱ्यांना लिलाव करतात. दररोज सकाळी चार वाजता येथे भाजी पाल्याचा लिलाव केला जातो. यामध्ये अनेक व्यापारी व शेतकरी दररोज सहभागी होतात.

शहरातील सर्व छोटे- मोठे भाजी विक्रेते या लिलाव मंडई येथे भाजीपाला खरेदी साठी दररोज येत असतात बाजार समितीचे प्रशासक अनिल महाजन यांनी मुख्य प्रशासक दिलीप वाघ यांना लेखी पत्र देऊन हा विषय मिटिंग अजेंडावर घेण्या संदर्भात विनंती केली होती. त्या अनुषंगाने सभेमध्ये हा विषय घेण्यात आला. अनिल महाजन यांनी सदर विषयाबाबत मार्केट यार्ड मधील लिलाव भाजी मार्केटला "महात्मा ज्योतिबा फुले" यांचे नाव देण्यास बाबतचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सर्व प्रशाकीय मंडळाने एक मताने होकार दिला. मुख्य प्रशासक दिलीप भाऊ वाघ, प्रशासक रणजीत पाटील, चंद्रकांत धनवडे, अभय पाटील,युवराज पाटील, शिवाजी पाटील, आदी मंडळींनी सदर प्रस्तावाला संमती दर्शवली व एकमताने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

ठराव मंजूर झाल्यानंतर अनिल महाजन यांनी यावेळी सर्व प्रशासकीय मंडळाचे आभार मानले. या निर्णयामुळे पाचोरा बाजार समितीमध्ये नवनियुक्त प्रशासकीय मंडळाने एका चांगला निर्णय घेतल्याची भावना उपस्थितांपैकी अनेकांनी बोलून दाखवली.