Mumbai Local Train Death: जीवघेणा लोकल प्रवास! 20 वर्षांत 51,000 प्रवाशांचा मृत्यू, रेल्वेची हायकोर्टात माहिती

मुंबई हायकोर्टानं रेल्वे अपघाता होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल घेतली आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेमुळे होणाऱ्या अपघाताचा मृत्यूदर हा 40 टक्के इतका आहे.

Photo Credit -X

Mumbai Local Train Death:  मुंबई लोकल ट्रेन मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत नागरिक उपनगरीय रेल्वेने पोहोचतात. प्रवासादरम्यान लोकलमधील गर्दीमुळे अनेक अपघात होतात. त्यामध्ये अनेक जखणी होतात तर अनेकांचा मृत्यू होतो. गेल्या काही वर्षात रेल्वे अपघातात मृत्यूंची संख्या(Local Train Death) वाढली आहे. मुंबई हायकोर्टानं रेल्वे अपघाता होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल घेतली आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेमुळे होणाऱ्या अपघाताचा मृत्यूदर हा 40 टक्के इतका आहे. हा मृत्यूदर जगातील सर्वाधिक मोठा असल्यानं ती एक लज्जास्पद बाब असल्याचे ताशेरे हायकोर्टानं ओढले. मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून मुंबई हायकोर्टाला प्राप्त झालेल्या आकडेवारीत 20 वर्षांत रेल्वे अपघातात 51 हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. (हेही वाचा: Mumbai Local Train Stunt Video: लोकल ट्रेनमध्ये स्टंटबाजी, व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे पोलिसांकडून गुन्हा दाखल)

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त संतोष कुमार सिंह राठोड यांनी पश्चिम रेल्वेसाठी प्रतिज्ञापत्र दाखल करत सांगितले की, प्रशासन झालेल्या मृत्यूंबाबत संवेदनशील आहे, परंतू आम्ही पर्यंत प्रयत्न करत आहोत. मात्र, प्रवाशांकडून चांगले सहकार्य मिळायला हवे. रेल्वेमध्ये आधीच 100 टक्क्यांहून अधिक क्षमतेने प्रवासी पर्वास करत आहेत. अतिरिक्त सेवा सुरू करण्यास सध्याच्या परिस्थितीत वाव नाही.

सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी, दर तीन मिनिटांनी रेल्वे गाड्या धावत असतात. 86 ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता असते, ज्यामुळे विलंब होतो आणि रेल्वे सेवा सुरू ठेवणे अत्यंत कठीण आहे. त्याशिवाय, रेव्लेने मृत्यू आणि अपघातात घट झाल्याचेही सांगितले आहे. 2016 मध्ये 1,084 मृत्यू आणि 1,517 जखमी झाले, तर 2023 मध्ये 936 लोकांचा मृत्यू झाला आणि 984 जखमी झाले.

2005 ते जुलै 2024 पर्यंत 22,481 लोकांना आपला जीव गमवावा लागला तर 26,572 लोक जखमी झाले. त्याचप्रमाणे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) शशी भूषण यांनी पूर्व रेल्वेचे प्रतिज्ञापत्र दाखल केले.

मध्य रेल्वे

प्रतिज्ञापत्रात रेल्वे रुळांवर सर्रासपणे होणाऱ्या अतिक्रमणाची प्रकरणे आणि रुळांच्या अगदी जवळ झोपडपट्ट्यांचे अस्तित्व या मुद्द्यांकडे त्यांनी लक्ष वेधले ज्यामुळे पावसाळ्यात वाहतुकीला विलंब होतो आणि पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण होते. मध्य रेल्वेने सांगितले की, गेल्या 15 वर्षांत त्यांनी प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढवून मृत्यूची संख्या कमी केली आहे. 2009 मध्ये 1,782 मृत्यू आणि 1,614 लोक जखमी झाले होते, ज्याचे प्रमाण 2023 मध्ये 1,221 मृत्यू आणि 938 जखमी झाले आहे. 2009 ते जून 2024 या कालावधीत 29,321 लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यात म्हटले आहे की, बहुतांश अपघात हे रुळ ओलांडल्यामुळे, काही गर्दीमधून खाली पडल्यामुळे, तर काही रेल्वे रुळांलगतच्या खांबांमुळे आणि प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या फूटबोर्डमधील अंतरांमुळे प्रवासी खाली पडल्यामुळे झाले.

ही आकडेवारी आणखी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने उपाययोजना केल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यात तसेच रेल्वे रुळांजवळील काही अतिक्रमणे हटवण्याची मागणी केली आहे, मुंब्रा खाडीवरील अनधिकृत वाळू उत्खनन थांबवण्याची मागणी केली आहे. ठाणे ते कल्याण दरम्यान समांतर रस्त्याची मागणी केली होती.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now