प्रत्येकाचे संरक्षण करणे आणि मृत्यू दर शून्यावर आणणे, हे आमचे उद्दीष्ट आहे- आरोग्यमंत्री राजेश टोपे
कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेते फेसबूक लाईव्हच्या (Facebook Live) माध्यमातून नागरिकांना योग्य ते मार्गदर्शन करत आहेत.
सध्या संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) कोरोना विषाणूशी (Coronavirus) झुंज देत असल्याचे दिसत आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेते फेसबूक लाईव्हच्या (Facebook Live) माध्यमातून नागरिकांना योग्य ते मार्गदर्शन करत आहेत. यातच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी नुकताच राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातला डबलिंग रेट हा सध्या सात दिवसांवर आहे. सध्या आपण जे कमी करतो आहे. डबलिंग रेटसाठी आता लागणारा कालावधी आपल्याला आणखी वाढवायचा आहे. आयसीएमआर ने ज्या सूचना दिल्या आहेत त्या अनुषंगाने आपल्याला काम करायचे आहे, असे राजेश टोपे म्हणाले आहेत. तसेच राज्यातील नागरिकांचे सरंक्षण करणे आणि मृत्यू दर शून्यावर आणणे हे आमचे उदिष्ट आहे, असेही ते म्हणाले आहेत.
कोरोना विषाणूने संपूर्ण भारताला हादरून सोडले आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. यामुळे प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहेत. कोरोनी विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन अधिक मेहनत घेत आहेत. मात्र, अद्यापही कोरोनाच्या आकडेवारीत सकारात्मक बदल दिसून आला नाही. देशात येत्या काही दिवसांत कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे पूर्व तयारी म्हणून राज्य सरकारने महत्वपूर्ण पावले उचलत आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान ते म्हणाले की, आपल्या महाराष्ट्रात 14 हॉटस्पॉट होते ते आता 5 वर आले आहेत. हे चित्र दिलासादायक आहे. औरंगाबाद, सांगली, अहमदनगर हे हॉटस्पॉट होते. मात्र, आता ते हॉटस्पॉट नाहीत. मालेगाववर जास्त फोकस केला असता तर हॉटस्पॉट चारच असते असेही त्यांनी म्हटले आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या ही व्यवस्थित आहे असेही टोपे यांनी स्पष्ट केले. धारावी आणि अन्य ठिकाणी मी केंद्रीय समितीसोबत होतो. जनतेत भीतीचे वातावरण आहे. 7 हजारांपेक्षा जास्ट टीम हे सर्वे करत आहेत. त्यामुळे कुणीही घाबरुन जाऊ नये, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच महाराष्ट्रात आत्तापर्यंत 90 हजाराच्या आसपास टेस्ट झाल्या आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- COVID19: महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा हाहाकार; मुंबई, पुणे शहरातील रुग्णांच्या संख्येत आणखी भर
एएनआयचे ट्वीट-
भारतात आतापर्यंत एकूण 20 हजार 471 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 652 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 3 हजार 960 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 5 हजार 649 वर पोहचली आहे. यापैंकी 269 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 789 जण कोरोनामुक्त झाले आहेत.