शिवसेना खासदार ओम राजेनिबांळकर यांच्यावर शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी तब्बल पाच महिन्यानंतर गुन्हा दाखल
तसेच निबांळकर यांच्यासह 52 जणांवर ही गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
शिवसेनेचे (Shiv Sena) उस्मानाबाद (Osmanabad) येथील खासदार ओम राजेनिबांळकर (Om Rajenimbalkar) यांच्यावर शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच निबांळकर यांच्यासह 52 जणांवर ही गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तर शेतकरी याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइट नोट लिहून त्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव सुद्धा लिहिले होते.
दिलीप ढवळे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दिलीप यांनी 12 एप्रिल रोजी दिलीप यांनी राजेनिबांळकर यांनी आर्थिक फसवणूक केल्यामुळे मानहानी सहन करावी लागली असल्याचे सुसाइट नोटमध्ये म्हटले होते. तसेच जमीन सुद्धा जप्त करण्यात आल्याने या सर्व त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे ही ढवळे यांनी म्हटले आहे. एवढेच नाही या प्रकरणाचे अन्य महत्वाचे पुरावे राहत्या घरातील कपाटात मिळतील असे ही त्यात लिहिण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी कसून तपासणी केल्यानंतर खासदार ओम राजेनिबांळकर यांच्यासह 52 जणांच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.('छत्रपती' उपाधीचा मान ठेवा; उदयनराजे भोसले यांच्या भाजपा पक्ष प्रवेशानंतर रोहित पवार यांची फेसबूक पोस्ट)
दिलीप यांनी त्यांची जमीन वसंतदादा बँकेकडे गहाण ठेवली होती. पण तेरणा कारखान्याचे कर्ज फेडून न शकल्याने ढवळे यांची जमिनीचा लिलाव करण्यात आला होता. त्यामुळे तणावाखाली आलेल्या ढवळे यांनी आत्महत्या केली होती. तर लोकसभा निवडणूकीपूर्वी हा प्रकार घडल्याने त्याच्या विरोधात प्रचंड संपात व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणी शरद पवार यांनी ढवळे यांच्या घरी जाऊन चौकशी केली होती. त्याचसोबत दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा शरद पवार यांनी केली होती.