नाशिकच्या भक्ती देसाई हिला जपानच्या OS Technology कंपनीकडून तब्बल 16.2 लाखांचे पॅकेज
नाशिकच्या संदीप फाउंडेशन संचलित एसआयटीआरसी कॉलेजमधील भक्ती देसाई या विद्यार्थीनीला थोडेथोडके नव्हे तर तब्बल 16.2 लाखांचे पॅकेज मिळाले आहे.
नाशिकच्या संदीप फाउंडेशन संचलित एसआयटीआरसी कॉलेजमधील भक्ती देसाई या विद्यार्थीनीला थोडेथोडके नव्हे तर तब्बल 16.2 लाखांचे पॅकेज मिळाले आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाची ती विद्यार्थीनी असून या विभागातील अजून 53 विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये कॅम्पस प्लेसमेंट मिळाली आहे.
जपानच्या ओएस टेक्नॉलॉजी कंपनीने भक्तीची निवड करत तिला 16.2 लाखांच्या पॅकेजची ऑफर दिली आहे. प्लेसमेंट प्रोसेसमध्ये सहभागी झालेल्यांपैकी केवळ 3 विद्यार्थ्यांची निवड कंपनीने केली आहे.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, कॉग्निझेण्ट, केपीआयटी, अॅमेझॉन, आयमस पीपल, वेब्बीझ प्रायव्हेट लिमिटेड, धूत इलेक्ट्रॉनिक्स औरंगाबाद, इपिक रिसर्च इंदोर या कंपन्यांमध्येही विद्यार्थ्यांना संधी मिळआली आहे. त्याचबरोबर त्यांनाही चांगले पॅकेज ऑफर करण्यात आले आहेत.