Russia-Ukraine War: नारायण राणे यांच्याकडून Operation Ganga मोहिमेत युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांचे मुंबई विमानतळावर स्वागत
या मोहिमेंतर्गत भारतात परतलेल्या 182 भारतीयांचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई विमानतळावर स्वागत केले. या भारतीयांमध्ये विद्यार्थांचा समावेही मोठ आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो भारतीयांच्या सुटकेसाठी भारत सरकारने ऑपरेशन गंगा (Operation Gang) ही मोहीम राबवली आहे. या मोहिमेंतर्गत भारतात परतलेल्या 182 भारतीयांचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई विमानतळावर स्वागत केले. या भारतीयांमध्ये विद्यार्थांचा समावेही मोठ आहे. ऑपरेशन गंगा (Operation Gang) मोहिमेंतर्गत मुंबईत दाखल झालेले भारतातील सातवे विमान आहे. जे युक्रेनमधील विद्यार्थी, नागरिकांन घेऊन आले आहे.
रशिया-युक्रेन संघर्षातून दोन्ही राष्ट्रांमध्ये युद्ध सुरु झाले आहे. शेकडो रशीयन फौजा युक्रेनमध्ये घुसल्याने आणि गोळीबार आणि बॉम्बवर्षाव सुरु असल्याने नागरिक बंकरचा आश्रय घेत आहेत. मात्र, शिक्षण आणि इतर कारणांमुळे युक्रेनमध्ये गेलेल्या भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठी परवड सुरु झाली आहे. भारत सरकारने त्यांची सुटका करुन त्यांना मायदेशी आणावे, अशी जोरदार मागणी, विनंती या नागरिकांकडून केली जात होती. त्यानंतर भारत सरकारने ऑपरेशन गंगा (Operation Gang) सुरु केले. (वाचा - Russia Ukraine Crisis: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील रशियाचा मतदानाचा अधिकार काढून घ्यावा, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष यांचे आव्हान)
ट्विट
ऑपरेशन गंगा (Operation Gang) मोहिमेंतर्गत मुंबईत दाखल झालेले भारतातील सातवे विमान आहे. जे युक्रेनमधील विद्यार्थी, नागरिकांन घेऊन आले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांचे हृदयद्रावक असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात हे विद्यार्थी मदतीची याचना करताना दिसत आहेत. अखेर प्रदीर्घ काळानंतर का होईना त्यातील अनेक विद्यार्थ्यांना भारतात सुरक्षीतपणे येता आले आहे.