आईचा ५५ हजारांचा सोन्याच्या हारसाठी केवळ ११ वर्षाचा मुलगा थेट चोराशीच भिडला

ही घटना मुंबईतील विरार परिसरात घडली. घरात कोणीही नसल्याचे पाहून चोराने संधी साधण्याचा प्रयत्न केला. परंतु , चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या चोराचा हा प्रयत्न निष्फळ ठरला असून या चोराला स्थानिक पोलिसांच्या अटक केली आहे.

(Photo Credits : File Image)

आईचा ५५ हजारांचा सोन्याचा हार पळवण्यासाठी आलेल्या चोराला केवळ ११ वर्षीय चिमुकल्याने चांगलाच धडा शिकवला आहे. ही घटना मुंबईतील विरार परिसरात घडली. घरात कोणीही नसल्याचे पाहून चोराने संधी साधण्याचा प्रयत्न केला. परंतु , चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या चोराचा हा प्रयत्न निष्फळ ठरला असून या चोराला स्थानिक पोलिसांच्या अटक केली आहे.

टाईम्स इंडियाने दिलेल्या वृतात,  तनिष्क महाडीक असे चोराशी झुंज देणाऱ्या मुलाचे नाव आहे. तनिष्क हा त्याचे आई-बाबा आणि लहान बहीणी यांच्यासोबत विरार परिसरातील एका इमारतीत तिसऱ्या मजल्यावर राहतो. तनिष्क हा इयत्ता पाचवीमध्ये शिकत आहे. बुधवारी तनिष्क हा दुपारी १२. ३० च्या दरम्यान शाळेतून घरी परतला. त्याचे वडील ऑफिसला गेले होतो आणि आई त्याच्या लहान बहिणीला शाळेत सोडवायला गेली होती. घरात कोण नसल्याचे पाहून अब्दुल खान (५२) याने विजेचे काम करायला आल्याचे तनिष्कला भासवून दिले. परंतु,अब्दुल घरात शिरल्यानंतर संपूर्ण घराची झडती घेऊ लागला. अब्दुलने कपाटातून आईचा सोन्याचा हार काढल्या बरोबर तनिष्कला कळाले की, अब्दुला हा विजेचे काम करुण्यासाठी आलेल्या नसून तर, चोरीचा उद्देशाने घरात शिरला आहे. त्यानंतर तनिष्कने त्याला अडवडण्याचा प्रयत्न केला. परंतु अब्दुलने त्याला बाजूला ढकलून दिले. अब्दुल हा आपल्या आईचा सोन्याचा हार घेऊन जात आहे, त्याला रोखले पाहिजे या हेतूने तनिष्क आलेल्या संकटाला न घाबरता त्याचा सामना केला. दरम्यान, अब्दुलने तनिष्कला तिसऱ्या मजल्यावरुन २ मजल्यावर खेचत आणले. बाहेर काहीतरी गोंधळ चालू असल्याची शेजाऱ्यांना संशय आला. शेजाऱ्यांनी दार उघडून पाहिले तर, तनिष्क हा चोराशी झुंज देत होता. त्यानंतर शेजाऱ्यांनी चोराला पकडून स्थानिक पोलिसांच्या स्वाधिन केले. सुदैवाने, चोराची झुंज देत असताना तनिष्कला कोणतीही दुखापत झाली नाही.

(हे देखील वाचा-पुणे: PUBG खेळावरुन वाद झाल्याने तरुणावर प्राणघातक हल्ला)

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुलने याआधीही अशाप्रकारची चोरी केली असून त्याच्यावर ७ गुन्हे नोंदवले गेले आहेत.