मुंबई: दादर मधील इमारतीच्या कड्यावरून पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न, Watch Video

आत्महत्येचा प्रयत्न करणारा हा 29 वर्षीय पोलिस कर्मचारी दादर मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर असलेल्या इमारतीच्या कठड्यावर उभा असल्याचं काही जणांच्या निदर्शनास आलं.

Police Suicide Attempt (Photo Credits: TV9 Marathi)

मुंबईतील दादरच्या (Dadar) शिंदेवाडी भागात आज एका पोलिसाने इमारतीच्या गच्चीवरील कड्यावर उभे राहून आत्महत्येचा प्रयत्न केला. TV9 मराठी ने दिलेल्या या वृत्तानुसार, एक पोलिस हवालदार दादरच्या एका चार मजली इमारतीच्या कड्यावर येरझा-या घालत होता. तो आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच वरिष्ठ अधिका-यांनी त्याच्याशी समजविण्याचा प्रयत्न केला. तब्बल 4 तास हा प्रकार सुरु होता. अखेर पोलिसांनी अनेक विनवण्या केल्यानंतर संबंधित पोलिस कर्मचा-याने आत्महत्येचा विचार मनातून काढून टाकला. मात्र हा सर्व प्रकार बघ्यांपैकी एकाने कॅमे-यात कैद केला.

ही धक्कादायक घटना आज सकाळी 10-11 च्या सुमारास घडली. आत्महत्येचा प्रयत्न करणारा हा 29 वर्षीय पोलिस कर्मचारी दादर मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर असलेल्या इमारतीच्या कठड्यावर उभा असल्याचं काही जणांच्या निदर्शनास आलं. त्यांनी हटकूनही तो मागे न फिरल्याने परिस्थितीचं गांभीर्य इतरांना लक्षात आलं. 'लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले आहेत, कोरोनाचा धोका नाही' असे सांगत महाराष्ट्र पोलिसांनी शेअर केला 'हा' खास व्हिडिओ

पाहा व्हिडिओ:

तर दुसरीकडे मुंबई पोलिस दलातील 1233 पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तसंच त्यापैकी 334 पोलिस कामावर पुन्हा रुजू झाल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे. या सर्व कोरोना योद्धांचे गृहमंत्र्यांनी अभिनंदन केले असून भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या मुंबई पोलिसांचा मला अभिमान वाटतो, अशा भावना त्यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.