Mumbai Traffic Update: अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री. सिध्दीविनायक मंदिरात भाविकांची गर्दी; वाहनांची कोंडी टाळण्याकरिता वाहतूक व्यवस्थेत बदल, घ्या जाणून

सिध्दीविनायक मंदिरात गणरायाच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत. श्री. सिध्दीविनायक मंदीर व आसपासच्या परिसरात वाहनांची कोंडी टाळण्याकरिता वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.

Mumbai Traffic Police

Mumbai Traffic Update: अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक श्री. सिध्दीविनायक मंदिरात गणरायाच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत. त्यामुळे दि. 25 जून 2024 रोजी श्री. सिध्दीविनायक मंदीर आणि आसपासच्या परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. परिणामी वाहतूक कोंडी टाळण्याकरिता ट्राफिक पोलिसांकडून परिसरातील मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहे. (हेही वाचा: Angarki Sankashti Chaturthi 2024 Moon Rise Timings: अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी व्रताची सांगता करण्यासाठी जाणून घ्या चंद्रोदयाच्या वेळा!)

पोस्ट पहा-

दरम्यान, श्री गणेशाचे दर्शन सोमवारी मध्यरात्री 1 वाजून 30 मिनिटांपासून ते पहाटे 3 वाजून 15 वाजेपर्यंत सुरू होते. त्यानंतर काहीकाळ दर्शन थांबवून नंतर पहाटे 3 वाजून 50 मिनिटांपासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत दर्शन पुन्हा सुरू करण्यात आले.  दुपारी 12 वाजून  30 मिनिटांपासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत भाविकांना दर्शन न थांबता घेता येणार आहे. त्यानंतर, संध्याकाळी 7 वाजून 10 मिनिटांपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत दर्शन सुरू राहील.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif