महाराष्ट्र: शिवाजी विद्यापीठाच्या 5 अभ्यासक्रमाच्या परीक्षा लांबणीवर

दरम्यान 25 इतर विषयांच्या परीक्षांना आजपासून सुरुवात होणार आहे.

Shivaji University (Photo Credits: Website/Official)

एकीकडे कोरोना व्हायरस (Coronavirus) महाराष्ट्रात पुन्हा झपाट्याने फैलावत चालला असून दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील तोंडावर आल्या आहेत. दरम्यान कोल्हापूर शिवाजी विद्यापीठात (Shivaji Univerity, Kolhapur) काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे 5 अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. यात बीए, बीकॉमच्या परीक्षांचा समावेश आहे. टीव्ही9 मराठीने दिलेल्या माहितीनुसार, लवकरच या परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाकडून जाहीर केले जाईल. दरम्यान 25 इतर विषयांच्या परीक्षांना आजपासून सुरुवात होणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पुढे ढकलणे ही बातमी नक्कीच आनंदाची नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी अभ्यासक्रम आणि परीक्षेची पुन्हा तयारी करणे ही गोष्ट खूपच त्रासदायक असते. कोल्हापूर शिवाजी विद्यापीठात काही तांत्रिक अडचण आल्याने या परीक्षा लांबणीवर पडल्याचे सांगण्यात येत आहे.हेदेखील वाचा- Fact Check: CBSE दहावीच्या Social Science परीक्षेचा अभ्यासक्रम कमी झाला आहे? इंटरनेटवर व्हायरल झालेल्या वृत्तामागील सत्य जाणून घ्या

शिवाजी विद्यापीठाच्या पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांमध्ये बीए, बीकॉम, बीएससी, बॅचलर ऑफ फूड टेक्नोलॉजी अँड मॅनेजमेंट, बीएससी फूड टेक्नोलॉजी अँड मॅनेजमेंट सर्व अभ्यासक्रम भाग-3 यांचा समावेश आहे. लवकरच या अभ्यासक्रमांचे नवे वेळापत्रक जाहीर केले जाईल.

या विद्यापीठाच्या अन्य छोट्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार आजपासूनच होणार आहेत. दरम्यान नागरिकांनी योग्य ती काळजी घेत आणि कोरोनाचे नियम पाळत या परीक्षा द्याव्यात असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर (Shivaji University Kolhapur) येथील सांख्यिकी विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. दिगंबर तुकाराम शिर्के (Dr. Digambar Shirke) यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी (Vice-Chancellor) नियुक्ती करण्यात आली होती. डॉ शिर्के यांचा जन्म 11 जून 1965 रोजी झाला आहे. वाठार तर्फ वडगाव, ता. हातकणंगले. जि. कोल्हापूर हे त्यांचे मूळ गाव होय. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून सांख्यिकी विषयात पदव्युत्तर पदवी तसेच पीएच. डी. प्राप्त केली असून, त्यांना अध्यापन, संशोधन तसेच प्रशासन क्षेत्रात व्यापक अनुभव आहे. शिवाजी विद्यापीठाच्या  कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपालांनी संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे अध्यक्ष तसेच संरक्षण संशोधन व विकास विभागाचे सचिव डॉ. जी. सतीश रेडडी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती.