MSRTC Extra Rounds Of Buses: एसटी महामंडळ दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 11 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत बसेसच्या दररोज 1 हजार जादा फेऱ्या वाढवणार
राज्य सरकारने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 11 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत बसेसच्या दररोज 1 हजार जादा फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
MSRTC Extra Rounds Of Buses: राज्य सरकारने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 11 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत बसेसच्या दररोज 1 हजार जादा फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी माहिती दिली आहे. या निर्णयानुसार, जास्त बसेसच्या फेऱ्या 11 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत चालवल्या जाणार आहेत. एसटी महामंडळाच्या या बस राज्यातील प्रमुख बसस्थानकांवरुन सुटणार आहे. या बसेसच्या आरक्षणाची सुविधा टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. प्रवासी आपले आगाऊ आरक्षण करण्यासाठी एसटी महामंडळाच्या www.msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. येथे प्रवाशांना आपले सीट आरक्षित करता येतील. (हेही वाचा - National Health Mission: राष्ट्रीय आरोग्य मिशन 400 कोटींचा गैरव्यहार; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र)
यंदा दिवाळीच्या सणावर कोरोना विषाणूचं संकट आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी एसटी महामंडळाने बसेसच्या जास्त फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळी निमित्त प्रवासी मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात. गर्दी टाळण्यासाठी एसटी महामंडळ दरवर्षी दिवाळी निमित्त जादा गाड्यांची सोय करत असते. (हेही वाचा - शरद पवार यांचे कौतुक करणारे 'ते' ट्विट भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडून डिलीट; आमदार रोहित पवार यांनीही रिट्विट करुन दिला होता प्रतिसाद)
महामंडळाने बसच्या फेऱ्या वाढवल्या असल्या तरी प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क लावणे बंधनकारक असणार आहे. लॉकडाऊन काळात पहिल्यादांच एसटी सेवा बंद करण्यात आली होती. मात्र, असं असलं तरी या काळात एसटीने मालवाहतूक करत मोठा महसूल गोळा केला. लॉकडाऊनमध्ये एसटी महामंडळाला मोठा तोटा सहन करावा लागला होता. त्यामुळे महामंडळाने राज्यभरात मालवाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.