Omicron Variant: कोरोनाच्या नव्या वेरियंटसंदर्भात आरोग्यमंत्र्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज आढावा बैठक

यामुळे अन्य देशात सुद्धा अधिक सतर्कता बाळगण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

Omicron Variant:  दक्षिण अफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या वेरियंटमुळे चिंता वाढली आहे. यामुळे अन्य देशात सुद्धा अधिक सतर्कता बाळगण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अशातच राज्य सरकारने शनिवारी साउथ अफ्रिकेतून येणाऱ्यांसाठी नियमावली जाहीर केली आहे. अशातच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आरोग्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक पार पडणार आहे. या बैठकीत नेमके कोणते निर्णय घेतले जातील याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

आज संध्याकाळी 5 वाजता पार पडणाऱ्या आढावा बैठकीत उद्धव ठाकरे यांच्यासह राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि टास्क फोर्सचे सदस्य असणार आहेत. तर राज्य सरकारने दोन्ही लसीचे डोस पूर्ण झालेल्यांनीच सार्वजनिक वाहतूकीचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचसोबत कोविड19 संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड ठोठावला जाईल असे स्पष्ट केले आहे.(Covid 19 New Variant: कोरोनाच्या नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व रुग्णालये, कोविड केंद्रे यांचे होणार संरचनात्मक, अग्निशमन आणि विद्युत ऑडिट)

Tweet:

दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की, लोकांना कोरोनाच्या नवीन प्रकाराची चिंता आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या लोकांना क्वारंटाईन केले जाईल आणि पूर्ण तपासणी करून जीनोम सिक्वेन्सिंग केले जाईल. महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार, कोरोना नियमांचे पालन न करणारी व्यक्ती टॅक्सी/खासगी वाहतूक चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये आढळून आल्यास, त्याला 500 रुपये दंड, तर ड्रायव्हर/हेल्पर/कंडक्टरलाही रु. 500 दंड आकाराला जाईल. बसेसच्या बाबतीत, वाहतूक एजन्सीच्या मालकास 1000 रुपये दंड आकारला जाईल.