CM Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखान, नवी मुंबईतून एका स्थानिक राजकीय नेत्यास अटक

संदीप म्हात्रे (Sandeep Mhatre) असे या व्यक्तीचे नाव आहे. संदीप म्हात्रे हे नवी मुंबईमध्ये राजकीय आणि सामाजिक नेते म्हणून ओळखले जातात.

Arrest | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर आक्षेपार्ह लिखान केल्याबद्दल नवी मुंबईतील कोपरखैरणे येथून एका व्यक्तीस पोलिसांनी अटक केली आहे. संदीप म्हात्रे (Sandeep Mhatre) असे या व्यक्तीचे नाव आहे. संदीप म्हात्रे हे नवी मुंबईमध्ये राजकीय आणि सामाजिक नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पत्नी भाजपच्या माजी नगरसेविका आहेत. म्हात्रे हे भाजप नेते गणेश नाईक यांचे खंदे समर्थक मानले जातात. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Uddhav Thackeray) यांच्याबाबद आक्षेपार्ह लिखान केल्याबद्दल भाजप पदाधिकारी जितेन गजारिया (Jiten Gajaria) यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर म्हात्रे यांना अटक करण्यात आली आहे.

शिवसेना उपशहर संघटक उमेश वाघ यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी जितेन गजारिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. जितेन गजारिया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याचा वाघ यांचा आरोप आहे. वाघ यांनी सायबर सपोलिसांकडे तक्रार केल्यानंतर गजारिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. वाघ यांनी फिर्यादित म्हटल्या प्रमाणे गजारिया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची बदनामी करणारा मजकूर सोशल मीडियातून प्रसिद्ध केला. (हेही वाचा, Non-Bailable Warrant Against Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट; बीडमधील परळी न्यायालयाचे आदेश)

संदीप म्हात्रे संदीप म्हात्रे यांना अटक झाली आहे तर दुसऱ्या बाजूला भाजपचे जितेन गजरिया यांची चौकशी सुरु आहे. मुंबईच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी जितेन गजारिया यांचा जबाब नोंदवून घेतला. चौकशी आणि जबाब झाल्यावर गजारीया यांना सोडण्यात आले. दरम्यान, गजारिया यांच्या वकिलांनी त्यांच्या ट्विटचे समर्थन केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहेत म्हणून टीका अथवा ट्विट करायचे नाही, असा कुठेही कायदा नसल्याचे गजारियाच्या वकिलांचे म्हणने आहे. जर कोणी कायद्याच्या चौकटीत राहून वर्तन करत असेल तर त्याला आक्षेप घेण्यास कारण नसल्याचे ते म्हणाले.