महाविकास आघाडीच्या ओबीसी नेते, मंत्र्यांनी ओबीसी समाजाबद्दल मावशीचे नव्हे आईचे प्रेम दाखवावे : ओबीसी नेते अनिल महाजन यांचा सत्ताधाऱ्यांमधील ओबीसी मंत्र्यांना टोला
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ओबीसी समाजासाठी स्थापन केलेली महाजोती संस्था महाविकास आघाडी ने तात्काळ सुरू करावी यासह पाच मागण्या करून महाविकास आघाडीला विनंती केली आहे.
ओबीसी जनक्रांती परिषद व महाराष्ट्र माळी समाज महसंघाचे प्रदेश अध्यक्ष, ओबीसी नेते, व अनिलभाऊ महाजन (Anilbhau Mahajan) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अन्य मंत्री यांना पत्र लिहून ओबीसी समाजाच्या भावना सरकार पर्यत पोहचण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांनी पत्र लिहले आहे. या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Uddhav Thackeray) यांच्यासह मागासवर्गीय मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) व मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) या मंत्र्यांना ही प्रत दिली आहे. पत्रात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ओबीसी समाजासाठी स्थापन केलेली महाजोती संस्था महाविकास आघाडी ने तात्काळ सुरू करावी यासह खालील पाच मागण्या करून विनंती केली आहे.
1 महाजोती या संस्थेवर IAS दर्जा च्या अधिकारीची एम डी म्हणून नेमणुक करावी
2 महाजोती संस्थेचे कार्यलाय मध्यभागी पुणे येथेच ठेवावे.
3 या महाजोती संस्थेला १००० कोटीचा निधी द्या.
4राज्यभरात या संस्थेचे विभागीय कार्यलाय सुरु करावे.
5 या महाजोती संस्थेमध्ये सर्व मूळ ओबीसी अधिकारी यांची नेमणूक करावी.
देवेंद्र फडणवीस भाजप सरकारने ओबीसी समाजाच्या विकासासाठी महाजोती नावाची संस्था स्थापन केली आहे. तसा कायदेशीर शासन निर्णय ही आहे. त्याचे मुख्य कार्यालय हे पुणे इथे होते. महाविकास आघाडी सरकारने ते विदर्भात नागपूर येथे हलवल्याचे समजते आहे. प्रत्येक समाजाचा नेता हा त्याच्या त्याचा समाजाची प्रगती कशी होईल ते बघतो मग सत्ताधारी पक्षातील ओबीसी नेते कुठ गणपती बुडवायला गेले की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. असा टोला महाजन यांनी लगावला.