Sharad Pawar On BJP: आता लोक धार्मिक मुद्यांवर मतदान करणार नाहीत, कर्नाटकातील पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होऊ शकतो - शरद पवार
दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्ष (BJP) सत्ता टिकवणार नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शनिवारी केला.
Sharad Pawar On BJP: कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Assembly Election 2023) राजकीय पक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्ष (BJP) सत्ता टिकवणार नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शनिवारी केला. ते म्हणाले की, आम्ही विरोधी पक्षांना एकत्र करून संयुक्त आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहोत, मात्र सर्वच राज्यांमध्ये वेगवेगळे स्थानिक प्रश्न आहेत.
जनतेच्या मनात काय आहे?
ओपिनियन पोलचा दाखला देत पवार म्हणाले की, जनतेने भाजपच्या विरोधात निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत त्यांना (भाजप) पुढील निवडणुकीत मोठा धक्का बसू शकतो. लोक यापुढे धार्मिक मुद्द्यांवर मतदान करणार नाहीत. धर्माच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडली जात आहे, जी आता चालणार नाही. (हेही वाचा - Anil Deshmukh Active: अनिल देशमुख सक्रीय; कापसाला प्रति क्विंटल 10 हजार रुपयांचा दर देण्याबाबत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्र)
भारत जोडो यात्रेला जनतेचा पाठिंबा -
दरम्यान, भारत जोडो यात्रेचा संदर्भ देत शरद पवार म्हणाले की, या यात्रेला जनतेचा पाठिंबा मिळाला आहे. काँग्रेसने देशव्यापी प्रवासाच्या आधारे पक्षाचे नेते (राहुल गांधी) यांची भ्रामक प्रतिमा सुधारली आहे. सीबीआय, ईडीच्या वक्तव्याचा संदर्भ देत वंचित बहुजन आघाडीचे (व्हीबीए) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सरकार विरोधी नेत्यांना लक्ष्य करत असून लोकांचे हक्क पायदळी तुडवले जात आहेत. (हेही वाचा - Maha Vikas Aghadi: प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत चर्चा; शरद पवार, संजय राऊत यांनीही दिली प्रतिक्रिया)
MVA एकजुटीने निवडणूक लढणार -
शरद पवार यांनी महाविकास आघाडी संबंधित प्रश्नावर आपले मत नोंदवले. आगामी निवडणुकीत एमव्हीए एकत्र निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील आठवड्यापासून नवी दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू होत असल्याने सर्व नेत्यांना सोबत घेऊन विरोधी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी वैयक्तिकरित्या अनेक विरोधी नेत्यांच्या संपर्कात आहे, असंही शरद पवार यांनी सांगितलं.