सुप्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचे निधन
मात्र, या कादंबऱ्यांशीवायही त्यांची अनेक पुस्तके विशेष गाजली. साध्य, सोप्या, सरळ भाषेत लिखाण करणे हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य होते.
आपलं संपूर्ण जीवन महिला, आदिवासी आणि लेखण यासाठी वाहून घेणाऱ्या अनुभवसमृद्ध लेखिका, कवयित्री कविता महाजन यांचे निधन झाले आहे. त्या ५१ वर्षांच्या होत्या. काही काळ त्या न्युमोनिया आजाराने ग्रस्त होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी गुरुवारी (२७ सप्टेंबर) अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगी, वडील असा परिवार आहे. महिला, साहित्य, समाज, संस्कृतीवरच्या भाष्यकार अशी त्यांची ओळख होती. 'ब्र', 'कुहू', 'भिन्न' या त्यांच्या कादंबऱ्या वाचकांनी डोक्यावर घेतल्या. मात्र, या कादंबऱ्यांशीवायही त्यांची अनेक पुस्तके विशेष गाजली. अलिकडील काळात समाज माध्यमांची ताकद ओळखून त्या त्यातूनही (खास करुन फेसबुक)आपले विचार व्यक्त करत. त्यांच्या फेसबुक पोस्टना युजर्सचा मोठा प्रतिसाद मिळत असे. त्यांच्या जाण्याने साहित्य विश्वात सन्नाटा पसरला आहे.
प्राप्त माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून महाजन यांच्या अंगात ताप होता. शिवाय त्यांना खोकला आणि दमही लागत होता. त्यांच्यावर पुणे येथील बावधन परिसरातील चेलाराम या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. श्वसनाचा त्रास सुरु झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. दरम्यान, डॉक्टरांनी त्यांची घेतलेली एच१एन१ टेस्ट निगेटिव्ह आली होती. न्युमोनियामुळे झाल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला, असे डॉक्टर म्हणाले.
ब्र', 'कुहू', 'भिन्न' या त्यांच्या कादंबऱ्या वाचकांनी डोक्यावर घेतल्या. मात्र, या कादंबऱ्यांशीवायही त्यांची अनेक पुस्तके विशेष गाजली. साध्य, सोप्या, सरळ भाषेत लिखाण करणे हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य होते. त्यांनी आपल्या लिखाणातून, महिला, आदिवासी आणि समाजातील पीडित लोखांची दु:खे, प्रश्न मोठ्या ताकदिने मांडले. त्यांच्या 'ब्र' या कादंबरीसाठी त्यांना मानाच्या समजल्या जाणाऱ्या साहित्य अकादमी पुरस्काराने गोरविण्यात आले होते.