Chandrakant Patil Statement on God: आपला कोणताच देव बॅचलर नाही, महापुरुषही बॅचलर नाही; चंद्रकांत पाटील यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान
त्यानंतर त्यांच्याविरोधात राज्यभरात आंदोलन झाली. तसेच पुण्यात त्यांच्यावर शाईफेकही करण्यात आली होती. आता आज पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
Chandrakant Patil Statement on God: आपला कोणताच देव बॅचलर नाही, महापुरूषही बॅचलर नाही, असं वादग्रस्त वक्तव्य राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं आहे. ते आज पुण्यात राष्ट्रीय युवा दिवसाच्या निमित्ताने युवा संवाद कार्यक्रमात बोलत होते. चंद्राकांत पाटील यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्यांवरून चंद्रकांत पाटील अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी महात्मा फुलेंसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्याविरोधात राज्यभरात आंदोलन झाली. तसेच पुण्यात त्यांच्यावर शाईफेकही करण्यात आली होती. आता आज पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचे पदसाद राज्यभरात उमटण्याची शक्यता आहे.
या कार्यक्रमामध्ये चंद्रकांत पाटील म्हणाले की, "आपला कोणतेच देव बॅचलर नाही, आपले कोणतेही महापुरुष बॅचलर नाहीत. संसार करूनही सगळं करता येते. हिंदू हा फक्त धर्म नाही, तर एक विचार आहे. हिंदू राजाने कुठल्याही धर्मावर आक्रमण केलेले नाही. आपला सनातन धर्म 5 हजार वर्षांपूर्वीचा आहे. हिंदू या शब्दाचा अर्थच सर्वधर्मसमभाव आहे. हिंदू विचारांमध्ये त्याचा आणि माझा देव एकच हा विचार मांडलेला आहे." (हेही वाचा - Chandrakant Patil वर शाई फेक प्रकरणी 7 पोलिस कॉन्स्टेबल, 3 ऑफिसर निलंबित; Pimpri Chinchwad Police कडून कारवाई)
पुढे बोलताना ते म्हणाले की, जगात असा कुठलाही मनुष्य नाही, ज्याचे रक्त हिरवे किंवा निळे आहे. देवाने माणसाला घडवताना कोणताही भेद केला नाही. माणसाचा जन्म हा स्पर्मपासून होतो. स्पर्म कुणाला दिसत नाही. पण तो स्पर्म 100 किलोचा माणूस तयार करतो. तो माणूस कसा आहे हे ठरवतो. सगळी माणसे त्याने बनवली आहेत. इंग्रज भारतात आले आणि आपली संस्कृती बदली. आईला मम्मी आणि वडिलांना पप्पा म्हणायला लागलो, असा टोलाही यावेळी पाटील यांनी लगावला. (हेही वाचा - Chandrakant Patil On Shivsena: शिवसेना फोडायची तयारी अडीच वर्षांपासून सुरू होती; चंद्रकांत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट)
पूर्वी मुलं मुलींची टिंगल करायचे आता मुली मुलांची टिंगल करतात. हिंदू हा एक विचार आहे. तुम्हाला कुठल्याही मंदिरात जाण्यापासून हिंदू धर्म अडवत नाही. हिंदू हा शब्द पूजेशी जोडला गेलेला नाही. आपल्या देशावर कितीतरी आक्रमणं झाली. मुस्लिम, इंग्रज, डच आले पण त्याचा भारतावर काही फरक पडला नाही. त्यामुळे आपला धर्म बुडाला का? छत्रपती संभाजी महाराजांचे किती हाल करण्यात आले. मात्र, तरीदेखील त्यांनी धर्म सोडला नाही, असंही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.