Mumbai Water Supply: मुंबईकरांसाठी महत्वाची माहिती; 11 नोव्हेंबर रोजी शहरातील 'या' भागात पाणी पुरवठा राहणार बंद
जलवाहिनीच्या तातडीच्या दुरुस्ती कामासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) क्षेत्रातील सात विभागातील पाणीपुरवठा (Water Supply) 11 नोव्हेंबर रोजी बंद राहणार आहे
जलवाहिनीच्या तातडीच्या दुरुस्ती कामासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) क्षेत्रातील सात विभागातील पाणीपुरवठा (Water Supply) 11 नोव्हेंबर रोजी बंद राहणार आहे. ए विभाग, ई विभाग, बी विभाग, एफ उत्तर, एफ दक्षिण, एम पूर्व, एम पश्चिम या सात भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यामुळे या सदर विभागातील नागरिकांना 10 नोव्हेंबर रोजी पाण्याचा पुरेसा साठा करण्याचे तसेच पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे मुंबई महानगरपालिकेने या भागातील सर्व नागरिकांना केले आहे. हे देखील वाचा- मुंबई महापालिकेकडून सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्याने नागरिकांकडून आतापर्यंत 4.78 कोटी रुपयांच्या दंडाची वसूली
कोणकोणत्या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार?
ट्रॉंबे निम्नस्तर जलाशयावरील सी.जी. गिडवाणी मार्ग, रामकृष्ण चेंबूरकर मार्ग, सह्याद्री नगर, कस्तुरबा नगर, अजिज बाग, अयोध्या नगर, म्हाडा कॉलनी, भारत नगर, आणिक गाव, विष्णू नगर, प्रयाग नगर आणि गवाण पाडा, साई बाबा नगर, शेल कॉलनी, सिध्दार्थ कॉलनी, पोस्टल कॉलनी, एचपीसीएल, बीपीसीएल, आरसीएफ, बीपीटी, टाटा पावर, रामकृष्ण चेंबूरकर मार्गावरील मारवाली चर्च, आंबापाडा, माहूल गाव, म्हैसुर कॉलनी, वाशी गाव, माहूल पीएपी, मुकुंद नगर एसआरए, लक्ष्मी नगर, कलेक्टर कॉलनी, सिंधी सोसायटी, चेंबुर कॅंम्प
तसेच चेंबुर नाका ते सुमन नगर मधील सायन - ट्रॉबे मार्गालगतचा भाग, परळ गाव, शिवडी पश्चिम आणि पूर्व, हॉस्पिटल झोन, काळे वाडी, कोकरी आगार, ऍन्टोपहील, वडाळा, गेट क्र. ४, कोरबा मिठागर, बीपीटी, डोंगरी ए झोन, वाडी बंदर, सेंन्ट्रल रेल्वे झोन, बीपीटी झोन, डॉकयार्ड झोन, हाथीबाग व हुसैन पटेल मार्ग आणि माऊंट रोड झोन, जे.जे. हॉस्पिटल, नेवल डॉक आऊटलेट झोन, सेंट जॉर्ज हॉस्पिटल.