ठाणे: उद्या अनेक भागात पाणीपुरवठा बंद; सहकार्य करण्याचे नागरिकांना आवाहन

पाणी पुरवठा नियोजनासाठी उद्या ठाणे शहरातील पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे.

No Water Supply In Thane (Photo Credit: Facebook/ Ek boond Pani)

पाणी पुरवठा नियोजनासाठी उद्या ठाणे शहरातील पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. बुधवार 19 जून सकाळी 9 ते गुरुवार 20 जून रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत म्हणजेच 24 तास पाणीपूरवठा बंद असेल. (मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये केवळ 10% पाणीसाठा शिल्लक)

ठाणे शहरातील घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवार नगर, कोठारी कम्पाऊण्ड, गांधीनगर, इंदिरानगर, श्रीनगर, लोकमान्यनगर, समतानगर, ऋतूपार्क, सिद्धेश्वर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, शैलेशनगर, संजय नगर आणि कळव्याच्या काही भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पाणी पुरवठा नियोजनासाठी स्टेम वॉटर डिस्ट्री अॅण्ड इन्फ्रा कंपनीकडून ठाणे महानगरपालिकेला करण्यात येणार पाणीपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्याचबरोबर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

नागरिकांनी पाण्याचा गैरवापर टाळावा आणि पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.