No Shirt Free Beer: 'नो शर्ट फ्री बियर' महिलांसाठी खास ऑफर, नवी मुंबई येथील एका बारची जाहीरात; कारवाईची मागणी
दावा केला जात आहे की, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बारमध्ये अश्लील आणि विचित्र वाटाव्यात अशा प्रकारे जाहीराती केल्या जात आहेत. या बारच्या ऑफरमध्ये 'पुरुषांसाठी नो शर्ट नो सर्विस' आणि महिलांसाठी 'नो शर्ट फ्री बियर' असे म्हटले आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे घेण्यात आलेल्या लॉकडाऊन (Lockdown) काळात अनेक व्यवसायांवर निर्बंध आले. त्यामुळे या व्यवसायांना चांगलाच फटका बसला. आता अनलॉक (Unlock) प्रक्रिया सुरु झाली आहे. अनॉलॉक झाले असले तरी, ग्राहक मिळत नसल्याने व्यावसायिक भलतेच चिंतेत आहेत. अशात नवी मुंबई (Navi Mumbai) येथील एका बारने (Beer Bar) भलतीच शक्कल लढवली आहे. या बारने महिला ग्राहकांसाठी विशेष ऑफर (Special Offer For Women) जाहीर केली आहे. 'नो शर्ट फ्री बियर' (No Shirt Free Beer) अशी ही ऑफर आहे. मद्यप्रेमी महिला ग्राहकांनी या ऑफरला कसा प्रतिसाद दिला हे पुढे आले नाही. मात्र, त्यावर अनेकांनी आक्षेप मात्र घेतला आहे. तसेच, या ऑफरमुळे हा बारही चांगलाच चर्चेत आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, नवी मुंबई येथील पाम बीच गॅलेरिया मॉलमधील एजेन्ट् जॅक्स बार ही ऑफर करतो आहे. दावा केला जात आहे की, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बारमध्ये अश्लील आणि विचित्र वाटाव्यात अशा प्रकारे जाहीराती केल्या जात आहेत. या बारच्या ऑफरमध्ये 'पुरुषांसाठी नो शर्ट नो सर्विस' आणि महिलांसाठी 'नो शर्ट फ्री बियर' असे म्हटले आहे. (हेही वाचा, आरोग्यासाठी दुधापेक्षा जास्त फायदेशीर आहे बिअर; PETA ने केला दावा, जाणून घ्या कारणे)
धक्कादायक असे की, 'अल्कोहोल किल्स कोरोना' अशी जाहीरातही या बारमध्ये करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. 'अल्कोहोल किल्स कोरोना' अशी जाहीरात करणे म्हणजे केवळ ग्राहकांची दिशाभूल करणे आहे. त्यामुळे अशा प्रकारे जाहीरात करुन ग्राहकांना आकर्शित करणाऱ्या या बारवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. लोकमत नेटवर्क 18 ने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, 'गाव तिथे बिअर शॉप' म्हणत आपला प्रचार करणाऱ्या वनिता यांना मिळाली 'इतकी' मते)
भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नवी मुंबईतील पाम बीच गॅलेरिया मॉलमधील एजेन्ट् जॅक्स बारमध्ये सुरु असलेला हा प्रकार उघडकीस आणला आहे. या बारवर कारवाई होणार का याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, काही असले तरी बारमधील ऑफर आणि त्याची केली जाणारी विचित्र जाहीरात याची मात्र सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. सहाजिकच बारची जाहीरातही होऊ लागली आहे.