No Honking Day in Mumbai: मुंबई मध्ये आज ट्राफिक पोलिसांकडून ' नो हॉन्किंग डे'

सध्याच्या नियमावलीनुसार, शांतता क्षेत्रामध्ये आवाज 40 डेसिबल पेक्षा जास्त नसावा.

No Honking Day

मुंबई ट्राफिक पोलिसांकडून (Mumbai Traffic Police) 9 ऑगस्ट प्रमाणे आज (16 ऑगस्ट) दिवशी देखील शहरात ध्वनी प्रदुषणाला रोखण्यासाठी खास “No Honking Day” पाळला जाणार आहे. वाहन चालकांकडून विनाकारण हॉन्किंग केल्याने वाढणारी ध्वनी प्रदुषणाची पातळी कमी करण्यासाठी ट्राफिक विभागाकडून हे प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई ट्राफिक पोलिसांच्या अ‍ॅडव्हायजरीनुसार, विनाकारण हॉन्क केल्याने अनेक समस्या निर्माण होतात. ज्यामध्ये ध्वनी प्रदुषण ही एक महत्त्वाची समस्या आहे. त्याचा मानवी आणि प्राणी जीवनावरही गंभीर दुष्परिणाम होत आहे. Mumbai Traffic Police यांनी ट्वीट करत आजच्या नो हॉन्किंग डे बद्दलची माहिती दिली आहे.

नियमांचं उल्लंघन करणार्‍यांविरोधात Motor Vehicle Act, Mumbai Traffic Police section 194 (F)अंतर्गत कारवाई होणार आहे. निर्बंध असलेल्या ठिकाणी मोटारिस्ट कडून हॉन्किंग झाल्यास एक हजार रूपयांचा दंड होऊ शकतो.

चारचाकी किंवा दुचाकी चालकांनी मॉडिफाईड सायलंसर्स, एक्झॉस्ट पाईप लावले असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. Section 198 च्या नियमांचे उल्लंघन झाल्याने दंड आकारला जाऊ शकतो.

दरम्यान अग्निशमन दलाची वाहनं, रूग्णवाहिका या आपत्कालीन स्थितींतील सेवा असल्याने त्यांना मुभा असणार आहे. सध्याच्या नियमावलीनुसार, शांतता क्षेत्रामध्ये आवाज 40 डेसिबल पेक्षा जास्त नसावा.