Bombay High Court on Rape Case: 'कोणतीच मुलगी अनोळखी मुलासोबत पहिल्याच भेटीत हॉटेल रूममध्ये जात नाही'; बलात्काराच्या गुन्ह्यात मुलाला निर्दोष ठरवत न्यायालयाने नोंदवले निरीक्षण
त्याशिवाय, पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांनी व्यक्तीवर केलेल्या आरोपांवर शंका उपस्थिती केली.
Bombay High Court on Rape Case: एकल न्यायाधीश न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी बलात्कार प्रकरणातील एका खटल्यावर(Rape Case) मुलीच्या वागणूकीवर ताशेर ओढत तसेच तिने केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे सांगत महत्त्वाचे निरिक्षण नोंदवले आहे. ज्यात न्यायालयाने म्हटले की, 'कोणतीच मुलगी अनोळखी मुलासोबत पहिल्याच भेटीत हॉटेल रूममध्ये जात नाही' (Hotel Room Meeting)म्हटले. न्यायालयात सुनावणी झालेल्या या प्रकरणात मुलीची फेसबुकवर दोषी मुलासोबत ओळख झाली होती. त्यानंतर फोनवर दोघे एकमेकांशी बोलू लागले. (हेही वाचा: HC On Sexual Assault: दोन व्यक्तींमधील नातेसंबंध एखाद्याने आपल्या जोडीदारावर केलेल्या लैंगिक अत्याचाराचे समर्थन करत नाहीत; मुंबई उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिपण्णी)
संवाद वाढल्यानंतर फेब्रुवारी 2017 मध्ये मुलाने मुलीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मुलगा दुसऱ्या जिल्ह्यात रहायचा. तो मुलीला भेटण्यासाठी एकदा मुलीच्या कॉलेजमध्ये आला होता. त्यानंतर मार्च 2017 मध्ये मुलीच्या राहत्या घराजवळील हॉटेलच्या खोलीत त्याने मुलीला भेटण्यासाठी बोलावले. जिथे मुलाने मुलीला "काही तातडीच्या" समस्येबद्दल बोलणार असल्याचे सांगितले. त्यानंतर मुलगी त्याला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेली. (हेही वाचा: High Court On Lust Vs. Love: 'प्रेमातील शारीरिक संबंध वासना नव्हे', मुंबई हायकोर्टाकडून बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर)
हॉटेलच्या खोलीत प्रवेश केल्यावर त्यांनी संमतीने शारीरिक संबंध ठेवल्याचे सांगण्यात आले. मुलीने पुढे आरोप केला की मुलाने तिचे काही आक्षेपार्ह फोटो काढले. ते मुलीच्या नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांना फेसबुकवर शेअर केले. या घटनेनंतर मुलीने मुलासोबत ब्रेकअप केले.
त्यानंतर, असा युक्तिवाद करण्यात आला की मुलाने तिचे आक्षेपार्ह फोटो तिच्या होणाऱ्या नवऱ्यालाही शेअर केले, म्हणून ऑक्टोबर 2017 मध्ये मुलीने दोषीविरुद्ध गुन्हा दाखल केला.या तक्रारीला अविश्वसनीय संबोधून न्यायमूर्ती सानप यांनी 'पीडित मुलीची कृती ही कोणत्याच विवेकी व्यक्तीच्या वर्तनाशी सुसंगत नाही. ही त्यांची पहिली भेट होती. मात्र, त्या भेटीत मुलगी आरोपीच्या सांगण्यावरून हॉटेलच्या खोलीत गेली.', असे न्यायाधीश म्हणाले.
बलात्काराच्या गुन्ह्यात मुलाला निर्दोष ठरवले
'एखाद्या तरुण मुलाला पहिल्यांदा भेटणारी मुलगी हॉटेलच्या खोलीत जाणार नाही. मुलाच्या अशा वागण्याने मुलीला धोक्याचे संकेत मिळतात. माझ्या मते, ही घटना पूर्णपणे अविश्वसनीय आहे', असे न्यायमूर्ती सानप यांनी मत व्यक्त केले. न्यायालयाने नमूद केले की, 'पीडितेचे असे नाही की त्यांनी एकापेक्षा जास्त प्रसंगी शारीरिक संबंध ठेवले आणि एखादी मुलगी पहिल्यांदाच एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटत असेल तर ती त्याच्यासोबत निर्जन ठिकाणी जाणार नाही. जरी, एखाद्या वचनानुसार, मुलगी एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत खोलीत गेली आणि तिला काही अडचणीत टाकले, तर ती आरडाओरडा करू शकते. मात्र, तसे झाले नाही,' न्यायाधीशांनी जोर दिला.