किरीट सोमय्या यांना मुरगूड मध्ये No Entry; नगरपालिकेने मंजूर केला ठराव

Kirit Somaiya | (File Photo)

भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा कोल्हापूर दौरा पुन्हा एकदा वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. सोमय्या यांनी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. त्यानंतर सोमय्या यांना कोल्हापूर प्रवेशापासून पालिसांनी रोखले होते. मूरगूड महानगरपालिकेने सोमय्या यांच्या कायमस्वरूपी प्रवेश बंदीचा ठराव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे. सोमय्या यांना पालिकेने घातलेल्या प्रवेश बंदीवरून पुन्हा राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.

मूरगुड महानगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पर पडली. या सभेत किरीट सोमय्या यांना शहरात कायमस्वरूपी बंदी घालण्याचा ठराव मांडण्यात आला. जो एकमताने मंजूर करण्यात आला. टीव्ही 9 मराठी ने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी आपल्यावर केलेले आरोप म्हणजे भाजपचे षडयंत्र आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे या षडयंत्राचे मास्टरमाईंड आहेत, असे प्रत्युत्तर हसन मुश्रीफ यांनी दिले आहे. किरीट सोमय्या यांनी कराड येथे पत्रकार परिषद घेत हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचार आणि घोटाळ्याचे गंभीर आरोप केले. तसेच, या पुढेही मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा बाहेर काढणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगिले. सोमय्या यांच्या आरोपाला पत्रकार परिषद घेत हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले. या वेळी त्यांनी सोमय्या यांच्यावर 50 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानिचा दावा दाखल करणार असल्याचेही सांगितले.