NMMT Depot In Ghansoli Fire: घणसोली मध्ये एनएमएमटी च्या बस डेपो मध्ये भडकली आग; 5 बसचे नुकसान (Watch Video)
इलेक्ट्रिक बसच्या दुरुस्तीच्या कामादरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणल्याने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.
नवी मुंबई (Navi Mumbai) मध्ये आज (4 जून) सकाळी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन (NMMT) च्या घणसोली येथील बस डेपो मध्ये आग भडकल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी लागलेल्या आगीमध्ये आतापर्यंत 5 बस जळाल्याची माहिती समोर आली आहे.जळलेल्या काही बस या इलेक्ट्रिक तर काही डिझेल बस होत्या. मात्र आज NMMT च्या घणसोली डेपोमधील अग्नितांडवानंतर इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
FPJ च्या रिपोर्ट्स नुसार, इलेक्ट्रिक बसला लागलेली ही आग शॉर्ट सर्किंट मुळे लागली आहे. त्यामध्ये NMMT च्या बसचं नुकसान झालं आहे. सुदैवाने हे केवळ बसचं नुकसान आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. कोणीही जखमी नाही. आगीचं वृत्त समजताच तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फायरफायटर्स घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आग विझवली आहे. BEST Bus Catches Fire in Ghatkopar: घाटकोपरमधील गांधी नगर उड्डाणपुलावर बेस्टच्या बसला भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही, व्हिडिओ पहा.
NMMT च्या घणसोली बस डेपो मधील आग
या घटनेमुळे बसेसमधील fire safety standards वर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. काही दिवसांपूर्वीच, बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) उपक्रमाला देण्यात आलेल्या 50 नवीन इलेक्ट्रिक बसेसमध्ये गंभीर fire safety systems चा अभाव असल्याचे आढळून आले. Olectra ची उपकंपनी असलेल्या Evey Trans Private Limited ने पुरवलेल्या या 12 मीटर लांबीच्या बसेस मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक ताफ्याला बळकट करण्यासाठी 2100 इलेक्ट्रिक बसेसच्या मोठ्या ऑर्डरचा भाग आहेत.
तपासणी दरम्यान, या 50 बसेसपैकी कोणत्याही बसमध्ये फायर डिटेक्शन अँड सप्रेशन सिस्टम (FDSS) बसवलेली नव्हती असं आढळलं आहे. FDSS ही वाहन सुरक्षा नियमांनुसार एक महत्त्वाची आवश्यकता आहे.