NMMC Border Exapansion: नवी मुंबई महापालिका हद्दवाढ; ठाणे जिल्ह्यातील 14 गावांचा समावेश, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावरुन अधिसूचना जारी
ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे जुन्या मुंबई पुणे महामार्गावर असलेली दहिसर मोरी भागातील ती 14 गावे, नवी मुंबई महापालिकेतून वगळण्याचा निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागला होता.
नवी मुंबई महापालिका हद्दवाढ (NMMC Border Exapansion) अखेर ग्रामस्थांच्याच विनंतीमुळे पार पडली आहे. ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे जुन्या मुंबई पुणे महामार्गावर असलेली दहिसर मोरी भागातील ती 14 गावे, नवी मुंबई महापालिकेतून वगळण्याचा निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागला होता. जी 25 वर्षांपूर्वी नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट केली होती. पालिका हद्दीतून वगळल्यानंतर ही गावे पुन्हा जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या हद्दीत वर्ग झाली. दरम्यानच्या काळात या गावांचा म्हणावा तसा विकास झाला नाही. त्यामुळे शहरांच्या तुलनेत ही गावे मागास राहिली. त्यामुळे या नागरिकांनी आपली गावे पुन्हा महापालिका हद्दीत समाविष्ट करावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती.
ठाणे जिल्हा परिषद हद्दीत असलेल्या ग्रामस्थांच्या मागणीचा राज्य सरकारने सकारात्मक विचार करत या गावांच्या समावेशास हिरवा कंदिल दाखवला. राज्याच्या नगरविकास विभागाने याबाबतचा आदेश सोमावारी काढला. तत्कालीन नगरविकास मंत्री व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गावांचा समावेश नवी मुंबई हद्दीत करावा अशी मागणी पाठिमागील सहा महिन्यांपूर्वी राज्य सरकारला केली होती. ज्यावर आता निर्णय झाला. (हेही वाचा, NMMC Election: नवी मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी बांधकामे कायदेशीर करण्याची गावठाणवासीयांची मागणी, रहिवाशांनी स्वतःचे उमेदवार उभे करण्याचे दिले संकेत)
नवी मुंबई महापालिका क्षेत्र (विद्यामान स्थितीत)
सिडको वसाहती-10
झोपडपट्टी वसाहती- 49
गावे - 29
पालिकेतून वगळलेली आणि आता पुन्हा समाविष्ट केलेली गावे
दहिसर, मोकाशी, वालीवली, पिंपरी, निघू , नावाली वाकलण, बमारली नारीवली, बाले, नागावं, भांडरली, उत्तरशिव, गोटेघर
वरील 14 गावे 1994 मध्येच नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट केली होती. मात्र ही गावे कोणत्याही पालिका क्षेत्राशी नजिक नव्हती तसेच नवी मुंबईशी भौगोलिक दृष्ट्या संलग्न नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांचा या गावांना नवी मुंबई हद्दीत समावेश करायला विरोध होता. हळूहळू हा विरोध तीव्रतेने वाढत गेला. त्यामु